बीड- जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने प्राथमिक पदवीधर, प्राथमिक शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्र प्रमुख यांच्या घाऊक बदल्या नुकत्याच केल्या.यामध्ये मोठ्या प्रमाणावर पैशाचा खेळ चालला.जीएडी अर्थात सामान्य प्रशासन आणि शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांनी प्रत्येकाकडून किमान पंचवीस अन जास्तीत जास्त पन्नास हजार रुपये घेऊनच बदल्यांचे काम केले.
बीड जिल्हा परिषद मध्ये दाम घेतल्याशिवाय कोणतेच काम होत नाही हे वेगळे सांगायची गरज नाही.विशेषतःसामान्य प्रशासन विभाग ग्रामीण पाणी पुरवठा, आरोग्य, शिक्षण, बांधकाम,एफ डी मध्ये कोणत्याही फाईल साठी हजार पाचशे रुपये का होईना फाईलवर वजन ठेवावेच लागते.
शिक्षण विभागाने जिल्ह्यातील 28 प्राथमिक पदवीधर,9 प्राथमिक शिक्षक, अंतर जिल्हा बदली मधून आलेले 23 आणि 4 माध्यमिक शिक्षक यांच्या बदल्या केल्या.ही फाईल जीएडी कडून शिक्षण कडे पाठवण्यात आले.जीएडी मध्ये प्रति माणसी पंधरा हजार रुपये गोळा करण्यात आले. हे पैसे या कार्यालयात ज्याची चलती आहे अशा कर्मचाऱ्याने गोळा केले.
जीएडी मध्ये दिलेल्या दक्षिणेबद्दल निरोप शिक्षण विभागात पोहच झाला.अन शिक्षण मध्ये खाते प्रमुख,कार्यलय प्रमुख यांनी किमान दहा ते वीस,पंचवीस हजार रुपये घेतले अन शेवटी बदल्यांची प्रक्रिया पूर्ण झाली.
Leave a Reply