बीड – शहरातील उमाकिरण शैक्षणिक संकुल येथील दोन खाजगी कोचिंग क्लास घेणाऱ्या शिक्षकांवर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे. शैक्षणिक क्षेत्रात उघड झालेल्या या प्रकाराने शिक्षण क्षेत्राला काळिमा फासला गेला आहे.
बीड शहरातील मध्यवस्तीत असलेल्या उमाकिरण शैक्षणिक संकुल येथे वेगवेगळ्या प्रकारचे क्लासेस चालतात. या ठिकाणी शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थिनीच्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात विजय पवार आणि प्रशांत खटावकर या दोघांविरुद्ध पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.
उमाकिरण शैक्षणिक संकुलात मोठ्या प्रमाणात क्लासेस चालतात. हजारो विद्यार्थी या ठिकाणी शिकतात. अशात ही घटना उघड झाल्याने खळबळ माजली आहे.












Leave a Reply