बीड-शहरातील एसपी ऑफिस आणि जिल्हा रुग्णालयासमोर असलेल्या हॉटेल गौरव मध्ये मंगळवारी रात्री एक रंगारंग पार्टी झाली. या पार्टीत विभागीय चौकशी,डॉ साबळे यांच्यावर कुरघोडी कशी करायची असे विषय झाले.गौरव हॉटेलच्या या टेबलवर सिव्हिल मधलं नेमकं काय काय शिजल हे मात्र एक गूढच आहे.
बीड जिल्हा रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागाचे निवासी वैद्यकीय अधिकारी, ओएस ,स्टोर किपर आणि अजिनाथ मुंडे यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांची मंगळवारी ओली पार्टी झाली.बियर,व्हिस्की,स्कॉच अशा वेगवेगळ्या प्रकारच्या उंची मद्यासोबत चिकन आणि मटणाचे वेगवेगळे प्रकार,तसेच मुंबई वरून मागवलेला खास फिश अशी ही पार्टी होती.
कोरोना काळात तत्कालीन सीएस आणि कर्मचारी यांनी जे काही कुटाणे केले त्यात अजिनाथ मुंडे याचा मोठा सहभाग होता.त्यामुळे आऊटर चे आर एम ओ डॉ आव्हाड, ओएस सानप,स्टोर किपर ठाकर आणि आणखी एक दोन विशेष अतिथी पार्टीला हजर होते.
विद्यमान सीएस डॉ साबळे हे विभागीय चौकशी नंतर बदलून जातील आणि नाही गेले तर पालकमंत्री यांच्यामार्फत लावलेली फिल्डिंग कामाला येईल आणि आपले अडकलेले हात मोकळे होतील अशा अनेक विषयांवर एक एक घोट रिचवत मैफल रंगली.
या पार्टीत आणखी देखील महत्वपूर्ण विषयावर चर्चा झाली मात्र ती इथं करणे योग्य होणार नाही,एक मात्र नक्की आहे की,मुंडे यांना पाठीशी घालण्यासाठी अनेक जणांनी प्रतिष्ठा पणाला लावली आहे.मात्र सीएस डॉ साबळे हे आपल्या भूमिकेवर ठाम असून त्यांनी लावलेल्या शिस्तीचा अनेकांना त्रास होतोय हे नक्की.
Leave a Reply