वैशाली जामदार यांनी मराठवाड्यात बोगस शिक्षक भरतीला मदत केल्याची माहिती उघड!
नागपूर -बोगस शिक्षक भरती घोटाळ्यात अटक करण्यात आलेल्या शिक्षण उपसंचालक वैशाली जामदार यांनी नागपूर येथे कार्यरत असताना 211 शिक्षकांना शालार्थ आयडी दिल्याची माहिती समोर आली आहे. जामदार या छत्रपती संभाजीनगर येथे असताना देखील त्यांनी बोगस शिक्षक भरतीसाठी मदत केल्याची माहिती पुढे आली आहे. तसेच्या घोटाळ्यात अकोला चे माजी खा भेंडे यांच्या भावाचा समावेश असल्याचे उघड झाले आहे. सध्या ते फरार आहेत.
सतीश मेंढे हे भाजपाचे भंडारा लोकसभेचे माजी खासदार सुनील मेंढे यांचे सख्खे बंधू आहेत. त्यामुळे या प्रकरणाला नवीन वळण मिळण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे खासदार मेंढे यांच्या अनेक शाळा आहेत. वैशाली जामदार यांच्या अटकेनंतर पीडित शिक्षकांना हिंमत मिळाली असून वर्धेतील एक शिक्षिका तक्रार देण्यासाठी नागपुरात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यानंतर या प्रकरणात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
सतीश मेंढे हे २०१९-२० या काळात नागपूर विभागीय शिक्षण उपसंचालक पदावर कार्यरत होते. घोटाळ्यातील अटकेतील अधिकाऱ्यांची कसून चौकशी केली जात आहे. यानंतर घोटाळ्याला खतपाणी घालणारे काही शिक्षणाधिकारी, शिक्षण संस्थाचालक, मुख्याध्यापक, बोगस शिक्षक आणि मध्यस्थही एसआयटीच्या टप्प्यात असल्याची विश्वसनीय माहिती आहे.
या प्रकरणात २०१९ ते २०२५ पर्यंत तयार करण्यात आलेल्या बनावट शालार्थ आयडीचा तपास केला जात आहे. या घोटाळ्यात माजी उपसंचालक उल्हास नरड यांना गडचिरोलीतून अटक करण्यात आली होती. तीन दिवसांपूर्वी पोलिसांनी लक्ष्मण मंघाम याला अटक केल्यावर दुसऱ्या दिवशी माजी शिक्षण उपसंचालक अनिल पारधी यांना अटक केली. गुरुवारी या प्रकरणात चिंतामण वंजारी यांनाही अटक करण्यात आली.
सायबर पोलिसांनी शालार्थ आयडीचा तपास करून त्यातून कोणाच्या कार्यकाळात किती बनावट आयडी देण्यात आले याचा शोध घेण्यात आला. यात तत्कालीन उपसंचालक वैशाली जामदार आणि माजी सेवानिवृत्त उपसंचालक सतीश मेंढे यांचेही नाव पुढे आले. या माहितीच्या आधारे पोलिसांनी दोघांचेही अटक वॉरंट काढून वैशाली जामदार यांना छत्रपती संभाजीनगरातून अटक केली. मेंढे यांच्या अटकेसाठी पोलिसांचे पथक गुरुवारी भंडारा येथे गेले होते. तिथे मात्र ते न्हवते.
जामदार यांच्या काळात २११ आयडी
वैशाली जामदार या २०२१ ते २०२३ यादरम्यान नागपुरात उपसंचालक होत्या. त्यांच्या कार्यकाळात २११ बनावट शालार्थ आयडी तयार करण्यात आल्याची माहिती तपासादरम्यान समोर आली आहे. शालार्थ आयडी घोटाळ्यातील आर्थिक उलाढाल तब्बल शंभर कोटींच्यावर असल्याची धक्कादायक माहिती एसआयटीच्या तपासादरम्यान समोर आल्याची माहिती सूत्रांनी दिली. एसआयटीच्या पथकाने या दिशेनेही तपासाला सुरुवात केली असून या आकड्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.












Leave a Reply