बीड- न्यायालयाने बजावलेले अटक वॉरंट रद्द करण्यासाठी न्यायालयात हजर झालेल्या तृप्ती विजय बंब यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.बेकायदेशीर बांधकाम केल्याप्रकरणी वारंवार वॉरंट बजावल्या नंतर देखील सतत गैरहजर राहिल्याने न्यायालयाने ही कारवाई केली.
तृप्ती विजय बंब यांनी त्यांच्या जागेत अनधिकृत बांधकाम केले होते.या प्रकरणी नगर परिषदेने नोटीस बाजवली होती.मात्र बंब यांच्याकडून बांधकाम पाडून ने घेतल्याने नगर परिषदेने बीड शहर पोलिसात गुन्हा दाखल केला.हे प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर न्यायालयाने अनेकवेळा हजर राहण्यासाठी वॉरंट बजावले होते.मात्र तृप्ती बंब या न्यायालयात हजर झाल्या नाहीत.अखेर न्यायालयाने जेव्हा अटक वॉरंट काढले तेव्हा ते रद्द करण्यासाठी त्या स्वतः न्यायालयात हजर झाल्या.
वॉरंट रद्द करून जामीन मिळावा म्हणून त्यांनी वकिलामार्फत अर्ज केला.मात्र न्यायालयाने हा अर्ज रद्द करत त्यांना 20 जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली.त्यानंतर त्यांची रवानगी जिल्हा कारागृहात करण्यात आली.
Leave a Reply