परळी- स्व गोपीनाथ मुंडे यांनी स्थापन केलेल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडली.माजीमंत्री धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे या बहीण भावाची दिलजमाई झाल्याने निवडणूक बिनविरोध पार पडली. स्वतः पंकजा मुंडे,यशश्री मुंडे,वाल्मिकी कराड आणि अजय मुंडे हे नूतन संचालक असतील.
परळी सह मराठवाड्यात नावाजलेल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची संचालक पदासाठी निवडणूक जाहीर झाली होती.धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे या दोघांनी आपापले उमेदवार उभे केल्याने निवडणूक चुरशीची होईल असा अनेकांचा अंदाज होता.
मात्र या दोन्ही बहीण भावांनी कारखान्याच्या निवडणुकीत सलोख्याची भूमिका घेतली.दोन्हीकडून कारखाना बिनविरोध व्हावा असा प्रयत्न झाला.1 जून रोजी अर्ज मागे घेण्याची शेवटची मुदत होती.त्यावेळी दोन्हीकडील इच्छुक उमेदवार वगळता इतरांचे अर्ज मागे घेण्यात आले,त्यामुळे कारखान्याची निवडणूक बिनविरोध पार पडली.
नूतन संचालकामध्ये श्रीहरी मुंडे,रेशीम कावळे,ज्ञानोबा मुंडे,राजेश गित्ते,सतीश मुंडे,अजय मुंडे,पांडुरंग फड,हरिभाऊ गित्ते,सचिन दरक,सुरेश माने,वसंत राठोड,चंद्रकेतू कराड,शिवाजी गुट्टे,शिवाजी मोरे,सुधाकर शिनगारे,सत्यभामा आघाव,मंचक घोबाळे,पंकजा मुंडे,यशश्री मुंडे,केशव माळी,वाल्मिक कराड यांचा समावेश आहे.
Leave a Reply