बीड- दिल्लीत सुरू असलेल्या कुस्तीपटुच्या आंदोलनाची दखल सरकारने घ्यायला हवी अस म्हणत बीडच्या खा प्रीतम मुंडे यांनी घरचा आहेर दिला आहे.आगामी लोकसभा निवडणुकीत कोणीही उमेदवार समोर असला तरी आपलं काम ,लोकांशी असलेला संपर्क यामुळे आपल्याला अडचण येणार नाही अस सांगत त्यांनी धनंजय मुंडे यांना टोला लगावला .
बीड येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.देशभर गाजत असलेल्या महिला खेळाडूंच्या लैंगिक शोषणाच्या विषयात भाजपच्या बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांनी मोदी सरकारला घराचा आहेर दिला आहे. “या प्रकरणात खेळाडूंशी संवाद साधायला सरकारकडून कोणी गेले नाही, ही खेदाची बाब आहे. सरकारने खेळाडूंशी संवाद साधायला हवा होता”, अशी स्पष्ट भूमिका प्रितम मुंडे यांनी घेतली. बीड शहरात आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.
महिला खेळाडूंशी संबंधित प्रश्नावर बोलताना खासदार मुंडे यांनी ‘केवळ खासदारच नाही तर एक महिला म्हणूनही मला त्या महिला खेळाडूंबद्दल आस्था आहे. असे आरोप जेव्हा होतात, तेव्हा त्याची वेळेवर चौकशी व्हायला हवी होती, यातील सत्य समोर यायला हवे होते. सरकारकडून त्या महिला खेळाडूंशी संवाद साधायला कोणी गेले नाही. ते व्हायला हवे होते. त्या प्रकरणात योग्य ती कारवाई व्हायला हवी’ असे खा. मुंडे म्हणाल्या. एका भाजप खासदाराने अशी भूमिका घेतल्याने याची चर्चा होत आहे.
गेल्या नऊ वर्षात केंद्र सरकारने महिला,बेरोजगार, उद्योग याबाबत घेतलेल्या निर्णयामुळे देश बदलत असल्याचे सांगत त्यांनी बीड जिल्ह्यात नऊ वर्षात झालेल्या विकास कामांची माहिती दिली.
Leave a Reply