News & View

ताज्या घडामोडी

images 2024 12 13T111225.828

विष्णू चाटे सह चौघांच्या पोलीस कोठडीत वाढ!

केज -मसाजोग चे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात अटक असलेल्या विष्णू चाटे याच्या पोलीस कोठडीत चार दिवसांची तर इतर तीन आरोपीच्या कोठडीत बारा दिवसांची वाढ केली.

जयराम चाटे, महेश केदार, प्रतीक घुले व विष्णू चाटे या चौघाची पोलीस कोठडी संपली. त्यामुळे त्यांना केजच्या न्यायालयात हजर केले. या प्रकरणात आणखी तपास आवश्यक आहे असा म्हणत तपास अधिकाऱ्यांनी वाढीव कोठडीची मागणी केली.

विष्णू चाटे व इतरांनी वाल्मिक कराड याच्याशी बोलणे करून दिले आणि कराड याने खंडणी मागितली. त्यानंतर संतोष देशमुख यांची हत्या झाली. त्यामुळे हे सगळे गुन्हे एकमेकांशी निगडित आहेत, त्यामुळे कोठडीत वाढ़ मिळणे आवश्यक आहे असा युक्तिवाद तपास अधिकारी आणि त्यांच्या वकिलांनी केला.

बीडच्या काही पोलिसांमुळे वर्दी डागाळली, पहा न्यूज अँड व्यूज चा व्हिडीओ, चॅनेल ला सबस्क्राईब करा.👇👇👇👇👇👇

देशमुख मर्डर केसमधील सुदर्शन घुलेची हिस्ट्री पहा सोबतच्या व्हिडीओ मध्ये. 👇👇👇👇👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *