बीड- मी राज्यातच काम करण्यास इच्छुक असून माझ्यासाठी दिल्ली अजून वीस-पंचवीस वर्ष दूर आहे असं म्हणत राष्ट्रवादीचे माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी लोकसभेसाठी त्यांच्या नावाची होणारी चर्चा थांबवली . जवाहर आणि वैद्यनाथ मध्ये दोघा बहीण भावांची झालेली अंडरस्टँडिंग ही नवे समीकरण उदयाला घालणार आहे का या प्रश्नावर त्यांनी पत्रकारांसमोर हात जोडत हे तुम्ही समोरच्यांना सुद्धा विचारा की त्यांचा प्रवास राष्ट्रवादीच्या घड्याळाकडे सुरू आहे का असं म्हटलं.
9 जून 2023 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत अहमदनगर येथे सभेचे आयोजन करण्यात आले आहे याबाबत माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत धनंजय मुंडे म्हणाले की अहमदनगरचे सभा अतिविराट आणि ऐतिहासिक व्हावी यासाठी बीड जिल्ह्यातून जास्तीत जास्त राष्ट्रवादी पक्षावर प्रेम करणारे कार्यकर्ते नेण्यासाठी नियोजन सुरू आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेला 25 वर्ष होत असल्यामुळे ही सभा ऐतिहासिक ठरावी असा आमचा हेतू आहे बीड जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असल्याने जास्तीत जास्त संख्येने त्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी हजेरी लावावी यासाठी आम्ही बैठकांचे आयोजन केले आहे असेही ते म्हणाले.
2024 च्या होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी संभाव्य उमेदवार म्हणून आपले नाव आहे असा प्रश्न विचारल्यानंतर मुंडे यांनी मी राज्यातच आनंदी आहे अजून वीस-पंचवीस वर्षे तरी माझे दिल्लीला जायची इच्छा नाही पक्ष जो उमेदवार देईल त्याच्या पाठीशी भक्कमपणे ताकद उभी करण्यासाठी आपण प्रयत्न करू असेही ते म्हणाले
गेल्या दोन टर्म पासून भाजपच्या खासदार बीड जिल्ह्याला लाभले आहेत मात्र या दहा वर्षाच्या काळात कोणतेही भरीव असं काम केंद्र सरकारकडून मंजूर करून घेण्यात त्यांना अपयश आला आहे रेल्वेचे कोच तयार करण्याचा कारखाना बीडला आला असता तर ऊसतोड मजुरांच्या हातातला कोयता निघाला असता मात्र हे होऊ शकले नाही हे दुर्दैवी आहे अशी टीका धनंजय मुंडे यांनी यावेळी केली
या पत्रकार परिषदेला आमदार प्रकाश सोळंके आमदार बाळासाहेब आजबे आमदार संदीप क्षीरसागर राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस माजी आमदार अमरसिंह पंडित माजी आमदार उषाताई दराडे माजी आमदार संजय दौंड माजी आमदार सय्यद सलीम राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांची उपस्थिती होती
Leave a Reply