News & View

ताज्या घडामोडी

IMG 20241216 WA0041

मस्साजोग प्रकरणी आ संदीप क्षीरसागर आक्रमक!

नागपूर – मस्साजोग येथील दिवंगत सरपंच स्व.संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरनातील नराधम आरोपी अजूनही मोकाटच आहेत. अतिशय विदारक प्रकरण असताना यातील आरोपी अटक होत नाहीत. प्रशासनाकडून या प्रकरणात दिरंगाई कशाबद्दल होत आहे? असा सवाल उपस्थित करत मस्साजोग प्रकरणी, नागपूर येथे सुरू असलेल्या विधिमंडळ अधिवेशनादरम्यान आ.संदीप क्षीरसागर यांनी आक्रमक होत विधिमंडळ परिसरात आंदोलन केले.


केज तालुक्यातील मस्साजोग येथील दिवंगत सरपंच स्व.संतोष देशमुख यांचे अपहरण करून अतिशय अमानवीय, क्रूर दि.९ डिसेंबर २०२४ रोजी करण्यात आली आहे. अतिशय किरकोळ कारण असताना गुन्हेगारी प्रवृत्ती असलेल्या आणि बीड जिल्ह्यांश सत्ताधाऱ्यांचा राजाश्रय असलेल्या नराधमांनी हे कुकर्म केले आहे. स्व.देशमुख यांचे अपहरण झाले तेव्हा त्यांचे लहान बंधू यांनी केज पोलीस स्टेशन ला जाऊन सदरील घटनेची माहिती दिली तरीही तेथील पोलिसांनी वेळ वाया घालवत कुठलीही कारवाई न करता त्यांना तिथे बसवून घेतले. या वेळेत स्व.देशमुख यांचा जीव वाचला असता. पोलिसांनी जाणीवपूर्वक आरोपीना हे कृत्य करण्यासाठी सहकार्य केले होते काय असाही संशय या प्रकरणात येत आहे. स्व.देशमुख यांची हत्या इतक्या हैवानतेने करण्यात आली आहे कि, त्याची कल्पनाही अत्यंत क्लेशदायक आहे. एवढे गंभीर प्रकरण असतानादेखील याप्रकरणातील मुख्य आरोपी अजूनही मोकाट आहेत. त्यामुळे आ.संदीप क्षीरसागर यांनी महाविकास आघाडीतील आमदारांसह विधिमंडळा परिसरात आंदोलन केले.

वाल्मिक कराड यांचे कॉल रेकॉर्ड तपासा

स्व.संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात वाल्मिक कराड हे मुख्य सूत्रधार असू शकतात. मारेकरी असणारे सर्व आरोपी हे वाल्मिक कराड यांचे निकटवर्तीय आहेत हे स्पष्ट आहे. वाल्मिक कराड यांचे कॉल रेकॉर्ड तपास केवळ माझी एकट्याची नसून एकंदरीत देशमुख कुटुंबीय, सर्व मस्साजोग गाववासीय आणि जिल्ह्यातील अनेक लोकप्रतिनिधी यांची आहे त्यामुळे एकदा वाल्मिक कराड यांचे कॉल रेकॉर्ड तपासले तर सत्य पुराव्यासह बाहेर येईल असेही आ.संदीप क्षीरसागर यांनी यावेळी म्हटले.

बांगर कुटुंबियांना संरक्षण देण्याची मागणी

रामकृष्ण बांगर हे बीड जिल्ह्यातील एक संस्थाचालक आहेत. त्यांची संस्था वाल्मीक कराड यांना बळकावयची आहे. त्यामुळे बांगर कुटुंबियांवर गंभीर स्वरूपाचे खोटे गुन्हे दाखल करून दबाव आणण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे बांगर कुटुंबियांना संरक्षण देण्याची मागणीही आ.संदीप क्षीरसागर यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *