बीड -जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यस्थेचे तिनेतेरा वाजले असताना पेठ बीड भागात रात्री उशीरा झालेल्या गोळीबारात एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. अक्षय आठवले याने विश्वास डोंगरे याच्यावर चार ते पाच गोळ्या झाडल्या. जखमीला छत्रपती संभाजीनगर ला उपचारासाठी हालवण्यात आले आहे.
बीड जिल्ह्यात पोलीस आहेत कि नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. परळीतील व्यापारी अमोल डुबे याचे अपहरण असो कि मसाजोग चे सरपंच संतोष देशमुख याची निर्घृण हत्या असो. पोलिसांची इज्जत पार वेशीला टांगली गेली आहे.
या घटनेचा तपास सुरु असतानाच पेठ बीड भागातील प्रकाश आंबेडकर नगर मध्ये राहणाऱ्या विश्वास दादाराव डोंगरे याच्या घरी रात्री दोन वाजता जातं अक्षय आठवले याने गोळीबार केला. चार ते पाच राउंड फायर केले. ज्यातील एक गोळी लागल्याने विश्वास जखमी झाला.
या प्रकरणी पेठ बीड पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. जखमीचा जबाब घेण्यासाठी पोलीस संभाजीनगर ला रवाना झाले आहेत.
पेठ बीड पोलीस असो कि बीड शहर अथवा शिवाजीनगर प्रत्येक ठिकाणी पोलीस निरीक्षक यांचे मुन्शी, कलेक्शन करणारे, डिबी चे कर्मचारी यांना अवैध धंदे करणारांची सगळी माहिती असते मात्र आपले आणि साहेबांचे खिशे भरण्याच्या नादात हे कर्मचारी गुंडाना पाठीशी घालत आहेत. त्यामुळेच अक्षय आठवले सारख्या गुंडाची गोळीबार करण्याची हिंमत होते आहे.
पेठ बीड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुदिराज यांचा कारभार म्हणजे तर मला पहा अन फुल वहा असाच झाला आहे. गुटखा, मटका, दारू हे सगळे धंदे यांच्या हद्दीत बिनधास्त सुरु आसताना हे महाशय मात्र केवळ लक्ष्मीदर्शन किती अन कधी होते यावरच लक्ष ठेवून असतात अशी चर्चा सुरु आहे.
Leave a Reply