केज- वाल्मिक कराड यांच्या सह राष्ट्रवादीच्या केज तालुकाध्यक्षवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मस्साजोग येथील अवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांना धमकावत असल्याची तक्रार केली असून संबंधित अधिकाऱ्यांचे
अपहरण करून जिवे मारण्याची धमकी देण्यात आलेली असल्याची तक्रार अवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी केज पोलिस ठाण्यात दिली आहे. त्यामुळे केज पोलिसांनी वाल्मिक कराड यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे केज तालुकाध्यक्ष विष्णू चाटे व मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या खुनाचा गुन्हा दाखल असलेला सुदर्शन घुले या तिघाजणावर खंडणीचा व जिवे मारण्याची धमकी दिली असल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.त्यामुळे केज मध्ये पुन्हा अपहरण आणि खंडणीचा गुन्हा दाखल झाल्याने खळबळ माजली आहे.
याबाबत मस्साजोग येथील अवादा कंपनीचे अधिकारी सुनिल केदु शिंदे वय 42 वर्षे व्यवसाय खाजगी नौकरी, रा.व्दारका रेसिडन्सी, उपनगर पोलीस ठाणेचे मागे, व्दारका, नाशीक रोड, नाशीक ह.मु. मोंढा रोड, बीड ता. जि. बीड मो. नं. 7303093045 समक्ष विचारले वरुन पोलीस ठाणे केज येथे हजर येऊन तोंडी सांगतो की, मी वरील ठिकाणचा राहणार असुन मागील एक वर्षापासुन अवादा एनर्जी प्राव्हेट लिमीटेड कंपनीत प्रकल्प अधिकारी म्हणुन काम पाहत आहे.माझ्याकडे बीड जिल्हयातील केज तालुक्यातील विविध ठिकाणी पवन उर्जा प्रकल्पाचे मांडणी व उभारणीचे काम आहे.
मस्साजोग या ठिकाणी प्रकल्पाचे मुख्य कार्यालय असुन, त्या ठिकाणी माझे सोबत विविध प्रकल्पाचे अधिकारी कान पाहत आहेत.माझे सहकारी शिवाजी नाना थोपटे हे जमीन अधिग्रहण विभागाचे काम पाहतात. आमचे पवन उर्जा प्रकल्पाचे प्रमुख म्हणुन श्री. सतिष कुमार हे महाराष्ट्रात काम पाहतात.दि. 29.11.2024 रोजी 10.00 वा सुनारास मी मस्साजोग येथील अवादा एनर्जी प्रकल्पाचे कार्यालयात हजर असतांना माझे मोबाईल क्रमांक 7303093045 वर विष्णु चाटे यांचा मोबाईल क्रमांक 9763736577 वरून फोन आला व त्यांनी मला वाल्मीक आण्णा बोलणार आहेत असे म्हणाले, आरे ते काम बंद करा,ज्या परिस्थीती मध्ये सुदर्शनने सांगीतले आहे, त्या परिस्थीतीत काम बंद करा, अन्यथा त्याचे परिणाम गंभीर होतील, काम चालु केले तर याद राखा असे म्हणून प्रकल्पाचे काम बंद करणे बाबत धमकी दिली.मी व शिवाजी थोपटे असे कार्यालयात हजर असतांना दुपारी 02.30 वाजण्याचे सुमारास सुदर्शन घुले रा. टाकळी हा आमचे मसाजोग येथील प्रकल्पाचे ठिकाणी आला व त्यांनी पुन्हा काम बंद करा,अन्यथा जी मागणी यापुर्वी केलेली आहे त्याची पुर्तता करा असे म्हणुन केज मध्ये चालु असलेल्या इतर ठिकाणाचे अवादा कंपनीचे सर्व काम बंद करा अन्यथा तुमचे हात पाय तोडुन तुमची कायमची वाट लावुन टाकील असे म्हणुन धमकी दिली होती.
काही दिवसापुर्वी शिवाजी थोपटे यांना वाल्मीक आण्णा कराड यांनी त्यांचे परळी येथील कार्यालयात बोलावुन अवादा कंपनीचे केज तालुक्यातील सर्व काम बंद करा अन्यथा काम चालु ठेवायचे असेल तर दोन करोड रुपये दया असे सांगीतले होते. त्यानंतर वेळोवेळी विविध लोकांचे मोबाईल वरुन प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रित्या प्रकल्पाचे काम बंद न ठेवल्यास मारहान करण्याच्या व जिंवे मारण्याच्या धमक्या दिलेल्या आहेत.यापुर्वी दि. 28.05.2024 रोजी 11.00 वाजण्याचे सुमारास याच कारणावरुन माझे आपहरण केलेले होते..
त्या बाबत मी पोलीस ठाणे केज येथे तक्रार दिली होती. त्यावरुन पोलीस ठाणे केज गुरनं 285/2024 गुन्हा दाखल आहे. तसेच दि. 06.12.2024 रोजी देखील सुदर्शन घुले व इतर यांनी आवादा कंपनीचे मस्साजोग येथील प्रकल्पाचे ठिकाणी जबरदस्तीने प्रवेश करुन गेटवरील कामगारांना धमकी देऊन मारहान केली होती. त्यावेळी आमचे कंपनीचे शिवाजी थोपटे यांनी सुदर्शन घुले व इतर लोकांविरूध्द पोलीस ठाणे केज येथे तक्रार दिल्याने गुन्हा दाखल झालेला आहे.
तरी मी काम करत असलेल्या अवादा कपंनीचे केज तालुक्यातील पवन उर्जा प्रकल्पाचे काम बंद करण्यासाठी वाल्मीक कराड रा. परळी ता. परळी, विष्णु चाटे रा. कौडगाव ता.केज व सुदर्शन घुले रा. टाकळी ता.केज जि. बीड हे वारंवार प्रकल्पाचे काम चालु झाल्यापासुन धमकी देत आहेत. त्यामुळे मी त्यांचे दहशती खाली असल्याने व माझी मनस्थीती बरोबर नसल्याने मी आमचे कपंनीचे वरिष्ठ पदाधिकारी यांचेशी चर्चा करून त्यांचे सल्ल्याने आज उशिराने तक्रार दाखल केली असल्याचे म्हटले आहे.
Leave a Reply