News & View

ताज्या घडामोडी

वाढत्या गुन्हेगारीबद्दल पंकजा मुंडे भेटणार फडणवीसांना!

मुंबई -बीड जिल्ह्यात दिवसाढवळ्या झालेली सरपंचांची हत्या असो कि परळीतील व्यापाऱ्याचे अपहरण असो, बीड जिल्ह्यात बिघडलेली कायदा आणि सुव्यवस्था याबाबत आ पंकजा मुंडे यांनी चिंता व्यक्त केली आहे. याबाबत आपण स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

दोन दिवसापूर्वी केज तालुक्यातील मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली. तसेच परळीतील व्यापारी अमोल डुबे यांचे खंडणीसाठी अपहरण करण्यात आले. या दोन्ही घटना अतिशय गंभीर असून या दोन्ही घटनांचा तपास विशेष तपास यंत्रणेद्वारे व्हावा अशी मागणी भाजपच्या राष्ट्रीय सचिव आमदार पंकजा मुंडे यांनी केली आहे.

जिल्ह्यात घडणाऱ्या अशा घटनांविषयी आमदार पंकजा मुंडेंनी चिंता व्यक्त केली आहे. जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारी घटनांसंबंधी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याशी चर्चा करणार असल्याचे आमदार पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे.

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग येथील माजी सरपंच संतोष देशमुख यांचा खून झाल्याची घटना घडली आहे. त्याचप्रमाणे परळी येथील तरूण व्यापारी अमोल डुबे यांचे सोमवारी रात्री अपहरण करून त्याला लूटमार केली. या दोन्ही घटनांबरोबरच जिल्ह्यात अलिकडच्या काळात घडलेल्या गुन्हेगारी घटना चिंताजनक आहेत, पोलिसांनी या दोन्ही घटनांची स्पेशल इन्व्हिस्टीगेशन टीमद्वारे (एसआयटी) सखोल चौकशी करावी, अशी मागणी आमदार पंकजा मुंडे यांनी केली आहे. पंकजा मुंडे यांनी बीड जिल्ह्यात अशा घटना घडत आहेत याबद्दल संताप व्यक्त केला आहे . जिल्ह्यातील गुन्हेगारी घटनांबद्दल मी स्वतः मुख्यमंत्र्यांशी भेटून चर्चा करणार आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *