मुंबई -महाराष्ट्रात महायुतीचे सरकार येणार हे निश्चित झाले आहे. महायुतीचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार देवेंद्र फडणवीस, शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी राजभवनावर दाखल झाले. त्यांनी राज्यपाल राधाकृष्णन यांच्याकडे पाठिंब्याचे पत्र दिले. गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजता आझाद मैदानावर शपथविधी सोहळा पार पडणार आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने तब्बल 233 जागा जिंकल्या, त्यामध्ये भाजपने 132 जागांवर विजय मिळवला. यानंतर मुख्यमंत्री कोण होणार अशी चर्चा सुरु झाली होती.
काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहा महिन्यासाठी मुख्यमंत्री करा अशी मागणी अमित शहा यांच्याकडे केली होती. मात्र भाजपने ही मागणी फेटाळली.
दरम्यान भाजपचा मुख्यमंत्री होणार हे नक्की झाल्यानंतर देखील कोण बसणार अशी चर्चा सुरु होती. बुधवारी केंद्रीय मंत्री निर्मला सितारामन आणि विजय रूपाणी हे मुंबईत दाखल झाले. भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक पार पडली.
या बैठकीत गटनेते पदावर देवेंद्र फडणवीस यांची निवड झाली. त्यानंतर दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास हे तिन्ही नेते राजभवनावर दाखल झाले आणि त्यांनी सत्ता स्थापनेचा दावा दाखल केला.
Leave a Reply