बीड- कोरोनाच्या काळात कोट्यवधी रुपयांची बोगस खरेदी दाखवून शासनाला चुना लावणाऱ्या स्टोर किपर अजिनाथ मुंडे याची बीड जिल्हा रुग्णालयात झालेली बदली तडकाफडकी रद्द करण्यात आली आहे. न्यूज अँड व्युजने याबाबत वृत्त दिल्यानंतर त्याची दखल घेत ही बदली रद्द करण्यात आली आहे.
बीड जिल्हा रुग्णालयात कोरोनाच्या काळात स्टोर किपर असलेल्या अजिनाथ मुंडे याने डॉ जयश्री बांगर,गणेश बांगर,राजरातन जायभाय यांच्या सोबत स्वताच्या नावावर कंपनी स्थपन करून कोट्यवधी रुपयांची बोगस साहित्य खरेदी केली.
याबाबत न्यूज अँड व्युज ने सातत्याने पाठपुरावा केला. त्यानंतर मुंडे यांची बदली हदगाव येथे झाली होती.मात्र मध्यंतरी त्याने पुन्हा बीडला रुजू होण्याचा प्रयत्न केला.त्यावेळी त्याला सीएस डॉ सुरेश साबळे यांनी रुजू करून घेतले नव्हते.
दरम्यान सरकार बदलल्यानंतर मुंडे याने थेट सीएस एकनाथ शिंदे यांच्याकडे वशिला लावला.स्थानिक पदाधिकारी यांनी त्यासाठी आपले वजन खर्ची घातले अन आपल्या पदरात देखील वजन पाडून घेतल्याची चर्चा होती.आठ दिवसांपूर्वी मुंडे याने बीड येथे बदली करून आणली.
याबाबत न्यूज अँड व्युज ने रविवारी बातमी केली. त्याची दखल आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतली.मुंडे यांची एसीबी आणि विभागीय चौकशी सुरू आहे. असे असताना त्याला पुन्हा बीडला रुजू करून घेतल्यास चौकशी वर परिणाम होऊ शकतो,म्हणून त्याची बदली तातडीने रद्द करण्यात आली आहे.
Leave a Reply