News & View

ताज्या घडामोडी

आगामी सत्तेत संदीप भैय्यावर मोठी जबाबदारी -शरद पवार!

बीड -सत्तेसाठी जवळचे सोडून गेले मात्र तत्वाशी तडजोड ना करता एकनिष्ठ राहिलेल्या बीडचे आ संदीप क्षीरसागर यांना विधानसभेत पाठवा मी त्यांच्यावर आगामी सत्तेत मोठी जबाबदारी देण्याचा शब्द देतो असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी संदीप यांच्या मंत्रिपदावर शिक्कामोर्तब केलं.

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारर्थ बीडच्या छत्रपती संभाजी महाराज स्टेडियम वरील विराट जनसभेला शरद पवार यांनी संबोधित केले.

यावेळी बोलताना पवार यांनी स्व केशर काकू क्षीरसागर यांच्या आठवणींना उजाळा दिला. काकूंनी घालून दिलेल्या आदर्शवर चालण्याचं काम संदीप भैय्या यांनी केलं आहे. गावाच्या शेवटच्या माणसाचा विकास व्हावा हा हेतू काकूंचा होता, त्यांचा आदर्श संदिपने कायम ठेवला.

दोन वर्षांपूर्वी पक्षात फाटफूट झाली, माझ्या घरच्या लोकांनी मला सोडलं, पक्ष फोडला मात्र बीड जिल्ह्यातून संदीप भैय्या या एकमेव तरुणाने तत्वाशी तडजोड ना करता माझी साथ दिली. त्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणावर त्रास झाला. अनेक योजना अडवल्या गेल्या.

परंतु काळजी करू नका, येणाऱ्या काळात महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे, या सरकारमध्ये संदीप भैय्या ला सरकारमध्ये मोठी जबाबदारी देऊन तुमच्या सेवेची संधी दिली जाईल आणि रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्यासाठी सत्तेत सहभागी करून घेतले जाईल असे आश्वासन शरद पवार यांनी दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *