News & View

ताज्या घडामोडी

images 2024 06 29T003623.091

क्षीरसागर मुक्त बीडसाठी मैदानात -कुंडलिक खांडे!

बीड – येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत क्षीरसागर मुक्त बीडसाठी आपण मैदानात राहणार आहोत, छत्रपती संभाजी महाराज यांच्या आघाडीच्या वतीणे आपण निवडणूक लढवणार असल्याचे खांडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

बीड विधानसभा निवडणुकीत माजिमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी माघार घेतली. तसेच मनोज जरांगे पाटील यांनी देखील माघार घेतली. त्यामुळे बीड विधानसभा निवडणुकीत अपक्ष असणारे मराठा समाजाचे कोण कोण राहणार अशी चर्चा होती.

कुंडलिक खांडे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले कि, जरांगे पाटील यांनी उमेदवार दिला असत तर आपण माघार घेतली असती मात्र त्यांनी माघार घेतल्याने आपण आपला अर्ज कायमच ठेवणार आहोत असेही त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *