जरांगे पाटलांचा डाव!
अंतरवली सराटी – महाराष्ट्राच्या राजकारणात गुरुवारी मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मोठी घोषणा केली. राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीत मराठा, मुस्लिम आणि दलितांचे कॉम्बीनेशन होणार आणि सत्ता परिवर्तन निश्चित घडणार अशी माहिती जरांगे पाटील यांनी दिली.
मुस्लिम समाजाचे प्रमुख मोलाना नोमानी आणि आनंदराज आंबेडकर यांनी अंतरवली सरटी येथे जाऊन पाटील यांच्यासोबत बैठक घेतली. या नंतर पत्रकार परिषदेत बोलताना जरांगे पाटील यांनी राज्याच्या राजकारणात नव्या समीकरणाची घोषणा केली.
यावेळी बोलताना जरांगे म्हणाले कि, राज्यात मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सत्ताधारी गंभीर नाहीत. आरक्षणाच्या मुद्द्यावर आम्ही अनेक आंदोलने केली. मात्र सरकारला घाम फुटला नाही.
येणाऱ्या निवडणुकीत मराठा,मुस्लिम आणि दलित हे तिघे मिळून सत्ताधाऱ्यांना खाली खेचतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी नोमानी यांनी आपण जरांगे पाटलांसोबत आहोतअशी माहिती दिली.
जरांगे पाटील यांनी राज्यात हा नवा प्रयोग केल्याने याचा सत्ताधारी महायुतीला फटका बसणार अशी चिन्हे आहेत.
Leave a Reply