बीड -राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे अधिकृत उमेदवार संदीप क्षीरसागर हे सोमवारी आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. साध्या पद्धतीने हा अर्ज भरण्यात येणार असल्याची माहिती आ क्षीरसागर यांनी दिली.
बीड – बीड विधानसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून आ.संदीप क्षीरसारांच्या नावाची अधिकृत घोषणा होताच दुसर्या दिवशी आ.संदीप क्षीरसागर यांनी आपल्या कार्यकर्त्यांसोबत बैठक घेऊन संवाद साधला. परंतु या बैठकीचे रूपांतर सभेतच झाले. यावेळी, सोमवारी (दि.२८) रोजी साध्या पद्धतीने महापुरूषांना अभिवादन करून अर्ज भरण्याचे ठरले आहे.
शनिवारी (दि.२६) रोजी बीड विधानसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून विद्यमान आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष संदीप क्षीरसागर यांच्या नावाची घोषणा पक्षाच्या वतीने करण्यात आली. त्यानंतर आ.क्षीरसागर यांनी रविवारी (दि.२७) रोजी राष्ट्रवादी भवन येथे मतदारसंघातील कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला. यावेळी उमेदवारी अर्ज भरण्याबाबत चर्चा करण्यात आली. या मध्ये सोमवारी (दि.२८) रोजी साध्या पद्धतीने, सणासुदीचा विचार करून सर्व कार्यकर्त्यांच्या मतानुसार लोकसभा निवडणुकीत खा.बजरंग सोनवणे यांचा अर्ज ज्याप्रकारे भरला होता अगदी त्याचप्रमाणे सर्व महापुरुषांना अभिवादन करून अर्ज भरण्याचे ठरले आहे. आ.क्षीरसागरांना उमेदवारी मिळाल्याने एकनिष्ठतेचा विजय झाला असून त्यामुळे कार्यकर्ते आणि सामान्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. आ.क्षीरसागर यांच्या बैठकीला प्रामुख्याने माजी आ.सय्यद सलीम, माजी आ.उषाताई दराडे यांच्यासह बीड विधानसभा मतदारसंघातील पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सोमवारी (दि.२८) रोजी मी, आपला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार), भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) व महाविकास आघाडीतील मित्रपक्षांचा अधिकृत उमेदवार म्हणून साध्या पध्दतीने अर्ज भरणार आहे. तरी बीड मतदारसंघातील मतदार मायबाप, बंधु-भगिनिंनी उद्या सकाळी १०:०० वाजता उमेदवारी अर्ज भरतेवेळी उपस्थित राहून शुभाशिर्वाद द्यावेत असे आवाहन आ.संदीप क्षीरसागर यांनी केले.
दरम्यान आ.संदीप क्षीरसागर यांनी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आपल्या कार्यकर्त्यांसोबत बैठक घेऊन संवाद साधला आणि लगेचच अंतरवाली सराटी येथे जाऊन क्रांतीकारी नेतृत्व मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली.
Leave a Reply