बीड- कोरोना काळात डॉ जयश्री बांगर,गणेश बांगर यांच्यासोबत कोट्यवधी रुपयांची बोगस खरेदी करून शासनाला चुना लावणारा स्टोर किपर अजिनाथ मुंडे हा पुन्हा बीड जिल्हा रुग्णालयात रुजू होण्यासाठी आला आहे.प्राप्त माहितीनुसार सीएस डॉ साबळे यांनी त्याच्याकडे स्टोर चा चार्ज देण्यास नकार दिला आहे.मात्र मुंडे यांनी थेट सीएम आणि आरोग्य मंत्र्यांकडे फिल्डिंग लावली आहे.रुग्णाच्या जीवाशी खेळत कोट्यवधी रुपयांचा घोटाळा करणाऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांकडे शिफारस करणाऱ्यांना लाज कशी वाटली नाही अशी चर्चा सुरू झाली आहे.
बीड जिल्हा रुग्णालयात कोरोनाच्या काळात डॉ जयश्री बांगर,गणेश बांगर,राजरतन जायभाये आणि अजिनाथ मुंडे या चौघांनी मिळून स्टोर किपर ठाकर ला सोबत घेऊन कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केला.यामध्ये अजिनाथ मुंडे यांनी स्वतःच्याच नावावर आणि नातेवाईक यांच्या नावावर कोट्यवधी रुपयांचा वस्तू पुरवठा केल्याचे दाखवले.
कोरोनाच्या काळात स्टोर ला प्राप्त झालेल्या रेमडिसिव्हीर इंजेक्शन मध्ये देखील मुंडे अँड कंपनीने गडबड केली.चाळीस पन्नास हजार रुपयांना एक इंजेक्शन विक्री केले.या प्रकरणात न्यूज अँड व्युज ने सातत्याने पाठपुरावा केला.त्यामुळे मुंडे यांची नांदेड येथे बदली झाली.
वर्षभरापूर्वी पासून मुंडे हे पुन्हा बीडला येण्यासाठी प्रयत्नशील होते.मध्यंतरी तर बीडला रुजू होणार होते,परंतु जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सुरेश साबळे यांनी त्यांचा तो प्रयत्न यशस्वी होऊ दिला नाही.
मात्र गेल्या आठ दिवसांपूर्वी मुंडे याने थेट सीएम आणि आरोग्यमंत्री यांच्याकडे वशिला लावून बीडला रुजू करून घेण्यासाठी पत्र आणले.त्यांना या कामी बीडच्या शिंदे सेनेतील काही लोकांनी मदत देखील केली.आता हे मुंडे महाशय पुन्हा स्टोर चा चार्ज घेण्यासाठी सीएस यांच्यावर दबाव आणत आहेत.
परंतु डॉ साबळे यांनी या प्रकरणात मुंडे यांना स्टोर चा चार्ज देण्यास असमर्थता दर्शवली आहे.मात्र मुंडे यांनी वेगवेगळ्या प्रकारे दबाव आणण्याचा प्रयत्न सुरूच ठेवला आहे.
कोट्यवधी रुपये खाऊन ढेकर ही न देणाऱ्या मुंडे सारख्यांची पाठराखण करताना आणि यांच्यासारख्या साठी सीएम आणि सरकारची दिशाभूल करणाऱ्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी जनाची नाही तर मनाची तरी ठेवावी अशी चर्चा होऊ लागली आहे.
Leave a Reply