News & View

ताज्या घडामोडी

धनंजय मुंडेंच्या विरोधात संजय दौण्ड!

परळी – राज्याचे लक्ष लागलेल्या आणि शरद पवार यांनी प्रतिष्ठा केलेल्या परळी मतदारसंघातून धनंजय मुंडे यांच्या विरोधात त्यांचेच सहकारी माजी आ संजय दौण्ड यांनी तुतारी फुंकण्याचा निर्णय घेतला आहे. भेटली तर तुतारी नाहीतर अपक्ष अशी भूमिका दौण्ड यांनी घेतली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर शरद पवार यांच्या हिटलीस्टवर असलेल्या नेत्यात धनंजय मुंडे यांचा सर्वात वरचा नंबर लागतो. लोकसभा निवडणुकीत पवार यांनी मुंडे यांची लायकी काढली होती.

आगामी विधानसभा निवडणुकीत देखील मुंडे यांच्या पराभवासाठी पवार यांनी टाईट फिल्डिंग लावली आहे. अर्ज भरण्याची अंतिम तारीख चार दिवसावर आलेली असताना देखील पवारांनी परळीच्या जागेचा सस्पेन्स कायमच ठेवला आहे.

राजेसाहेब देशमुख, राजाभावू फड, सुनील गुट्टे असे अनेक जण पवा्रांकडून इच्छुक आहेत. मात्र पवार हे धनंजय मुंडे यांचे जुने सहकारी संजय दौण्ड यांच्यासाठी आग्रही आहेत. दौण्ड पिता पुत्रानी त्यांची भेट देखील घेतली आहे.

दरम्यान संजय दौण्ड यांनी शुक्रवारी कार्यकर्त्यांचा मेळावा घेत संवाद साधला. यावेळी त्यांनी आपल्याला 2014 आणि 2019 ला विधानसभा का लधू दिली नाही याची कारने सांगितली तसेच आपण कोणामुळे आमदार झालो नाहीत तर आल्यावर कर्तृत्वावर आमदार झाल्याचे त्यांनी सांगितले.

येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मिळाली तर तुतारी नाहीतर अपक्ष मैदानात उतरण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *