News & View

ताज्या घडामोडी

n63553302617292383214869e3e023fb2977cbae2fae864b10be1c95a45f6f9ac1a889b6f6b034271e12f84

धस जरांगे पाटलांच्या भेटीला!

बीड – माजीमंत्री तथा भाजपकडून आष्टी मतदार संघातून निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेले सुरेश धस यांनी गुरुवारी रात्री एक वाजता अंतरवली सरटी या ठिकाणी जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतल्याने खळबळ उडाली आहे.

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या अनेक महिन्यांपासून रस्त्यावर उतरलेले मनोज जरांगे यांनी राज्यात निवडणुका जाहीर होताच आपला संताप व्यक्त केला. आता या निवडणुकीमध्ये निर्णायक मतदान हे मराठ्यांचे आहे. आता रणशिंग फुंकले आहे. लढाईला उतरायचं म्हणजे तलवार काढावी लागेल. सरकारने मराठा आरक्षणाबाबत सरकारने आमची आशा संपवली असल्याचे त्यांनी म्हटले होते. दरम्यान, मनोज जरांगे यांची मनधरणीचे प्रयत्न महायुतीच्या नेत्याकडून केल्या जात असल्याची चर्चा आहे. अशातच भाजपचे माजी आमदार सुरेश धस यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतलीय.रात्री एक वाजता सुरेश धस हे अंतरवलीत दाखल झाले. यावेळी जवळपास अर्धा तास या दोघात बातचीत झाली. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर धस यांनी अचानक मनोज जरांगेंची भेट घेतल्याने या भेटित काय चर्चा झाली हे मात्र अद्याप समोर आले नाही. मात्र, या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *