बीड -लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून इच्छुक असणारे आणि माजलगाव विधानसभा निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी करणारे डॉ अशोक थोरात यांची अचानक बीडच्या जिल्या शल्य चिकिस्तक पदावर नियुक्ती झाली आहे. डॉ अशोक बडे हे राजकारणाचा बळी ठरल्याची चर्चा यामुळे होतं आहे.
बीड जिल्हा रुग्णालयात कोरोना काळात वादग्रस्त ठरलेले आणि विभागीय चौकशी सुरु असणारे डॉ थोरात यांची पुन्हा याच पदावर नियुक्ती झाल्याने आश्चर्य व्यक्त होतं आहे.
बीड येथून बदली झाल्यानंतर डॉ थोरात यांनी लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाकडून मुलाखत दिली होती. मात्र त्यानंतर सोनवणे यांचे नाव फायनल झाल्याने त्यांनी माघार घेतली. सोनवणे विजयी झाल्याने डॉ थोरात यांना माजलगाव विधनासभेची जागा खुणावू लागली.
त्यांनी या साठी पुन्हा जोर लावला होता. विभागीय चौकशी सुरु असताना व्ही आर एस घेण्यासाठी प्रयत्न सुरु केले होते. परंतु ते ना झाल्याने त्यांनी मॅट मध्ये धाव घेतली होती.
दरम्यान अचानक सोमवारी सायंकाळी फोन थोरात यांची नियुक्ती बीडला झाल्याची ऑर्डर आली. थोरात हे माजलगाव मधून पवार गटाकडून आल्यास अडचणी येतील हे लक्षात घेऊन आ सोळंके आणि पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी तातडीने डॉ थोरात यांना बीडला आणून एक विषय मिटवल्याची चर्चा आहे.
Leave a Reply