बीड शहर पोलिसांच्या आशीर्वादाने सुरु असलेले हवाला रॅकेट पोलिस अधीक्षक यांच्या कारवाईने उध्वस्त झाले. शहर पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर सुरु असलेल्या या रॅकेट कडे शहर पोलिसांचे अर्थपूर्ण दुर्लक्ष होते हे यावरून समोर आले आहे.
बीड शहराच्या वेगवेगळ्या भागात हवाला मार्फत कोट्यावधी रुपयांची देवाणघेवाण केली जाते हे सर्वश्रुत आहे. मात्र शहर असो कि शिवाजीनगर अथवा पेठ बीड या ठाण्याच्या डिबी पथकाला, तसेच मुन्शी आणि कलेक्शन करणाऱ्यांना मॅनेज करून बिनबोभाट पणे हे उद्योग सुरु होते.
पोलीस अधीक्षक म्हणून रुजू झाल्यानंतर अविनाश बारगळ यांनी या दोन नंबर वाल्यांचे कंबरडे मोडण्यास सुरुवात केली आहे. बीड शहर पोलिसांच्या हद्दीतील डीपी रोड, काबाड गल्ली, मालिवेस या भागात सुरु असलेल्या हवाला ऑफिस वर पोलिसांनी छापा घातला. त्यामध्ये लाखो रुपयांची रोकड जप्त केली.
Leave a Reply