मुंबई -बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याने पोलिसांवर देखील गोळीबार केल्याची माहिती समोर आली आहे. तळोजा कारागृहातून साडेपाच वाजता त्याला घेऊन बदलापूरला जात असताना ही घटना घडली.या प्रकरणात पोलिसांनी केलेल्या गोळीबारात अक्षयचा मृत्यू झाला. या घटनेनंतर राज्यातील राजकारण तापले आहे. विरोधीपक्षांनी पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
या प्रकरणाबाबत बोलताना गृहमंत्री व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, अक्षय शिंदे याच्या पहिल्या पत्नीने लैंगिक अत्याचाराची तकार दाखल केली होती. त्या संदर्भात चौकशी करण्याकरता तळोजा कारागृहातून त्याला वारंट घेऊन बदलापूरकडे नेण्यात येत होते. त्याने पहिल्यांदा पोलिसांची बंदूक घेऊन फायर करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांनी स्वता : च्या बचावासाठी त्याच्यावर गोळी झाडली. या गोळीबारात अक्षय गंभीर जखमी झाल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
नेमकं काय घडलं……..!
अक्षय शिंदे याने पोलिसांकडे असलेली बंदूक हिसकावून घेतली आणि स्वत:वर गोळी मारली. यानंतर दुसऱ्या पोलिसाने अक्षय शिंदेवर गोळी झाडली असल्याचं सांगण्यात येत आहे. या गोळीबारामध्ये एका पोलिसाच्या पायाला गोळी लागली आहे.
बदलापूर प्रकरणाचा आरोपी अक्षय शिंदे याला ठाणे पोलीस जेलमधून घेऊन जात होती तेव्हा अक्षयने जीपमध्ये पोलिसांकडे असलेली रिव्हॉल्वर हिसकावीली आणि स्वत:वर गोळी झाडल्याचं सांगण्यात येत आहे.
महाराष्ट्र पोलिसांचा योगी पॅटर्न?
दरम्यान महिला अत्याचार प्रकरणी उत्तर प्रदेशमध्ये आरोपींवर गोळीबार झाल्याचे बरेच प्रकार याआधी घडले आहेत. पोलीस कस्टडीमध्ये असताना या आरोपींनी स्वत:वर गोळी झाडून आयुष्य संपवल्याच्या बऱ्याच घटना समोर आल्या. उत्तर प्रदेशमधल्या या घटनांचा उल्लेख योगी पॅटर्न म्हणूनही केला जातो.
Leave a Reply