बीड -मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषण आंदोलनाच्या समर्थनार्थ बीड जिल्हा बंद ला शनिवारी उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. मराठा आंदोलकांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देत आपल्या मागण्या शासनाकडे मांडल्या.
अंतरवली सराठी येथे गेल्या पाच दिवसापासून मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरु केले आहे. या दरम्यान त्यांची प्रकृती ढासळत आहे. सरकारने त्यांच्या मागण्याकडे दुर्लक्ष केल्याने समाजात संताप व्यक्त केला जातं आहे.
जरांगे पाटील यांच्या अंदोलनाच्या समर्थनार्थ बीड जिल्ह्यातील मराठा बांधवानी शनिवारी बंदची हाक दिली होती. त्याला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. सकाळी मराठा आंदोलकांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन देत आपल्या भावना व्यक्त केल्या.
Leave a Reply