बीड -टाटा, महिंद्रा अँड महिंद्रा, आयसीआयसीआय, एक्सीस, गोदरेज या सारख्या देशातील टॉप च्या कंपन्या मध्ये नोकरी करण्याची संधी रविवारी बीडच्या माँ वैष्णो पॅलेस मध्ये शिवसेनेच्या वतीने आयोजित नोकरी भरती महोत्सव मध्ये मिळणार आहे. या संधीचा लाभ बेरोजगार तरुणांनी घ्यावा असे आवाहन जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी केले आहे. या महोत्सव चे उदघाटन माजीमंत्री अर्जुन खोतकर यांच्या हस्ते होणार आहे.
जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी बीडमधील सुशिक्षित बेरोजगार तरुणांचे भविष्य उज्वल करण्यासाठी भव्य नौकरी मेळाव्याचे आयोजन केले आहे. यामुळे निश्चितच येणाऱ्या काळात हजारो तरुणांना लाभ होणार असून हजारो कुटुंबांना एक मजबूत आधार मिळणार आहे.
बीड जिल्हा शिवसेनेच्या वतीने बीडमधील युवक युवतींसाठी उद्या दि. 1 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 10.00 ते सायं 6.00 वाजेपर्यंत माँ वैष्णव पॅलेस, बीड येथे भव्य नोकरी भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सदर मेळाव्यात महाराष्ट्रातील 50 पेक्षा अधिक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नामांकित कंपन्यांचा सहभाग असणार आहे. मेळाव्यास उपस्थित प्रत्येक उमेद्वरास 100 % नोकरीची संधी प्राप्त होणार असून निवड झालेल्या उमेदवारांना तात्काळ नियुक्तीपत्र देण्यात येणार आहे.
विविध नामांकित कंपन्यांमधून ऑन द जॉब ट्रेनिंगची रोजगार संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. नौकरीची संधी प्राप्त करण्यासाठी शैक्षणिक पात्रता आठवी ते उच्च शिक्षण आणि लाभार्थी पात्रता 18 ते 30 वयोगटापर्यंत असणार आहे. मेळाव्यास उपस्थित राहणाऱ्या प्रत्येक उमेदवाराकडे नोंदणी अर्ज आणि बायोडाटा असणे आवश्यक आहे असे शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.
उपस्थित राहणाऱ्या सर्व युवक-युवतींना नौकरी मिळणार- जगताप
बीडमधील तरुण वर्ग नौकरीसाठी कायम भटकंती करताना दिसून येतो. मात्र अनेक ठिकाणी प्रयत्न करून सुद्धा पात्रता असताना देखील नौकरीची संधी प्राप्त होत नाही. ही बाब लक्षात घेऊन शिवसेनेच्या वतीने आम्ही बीडमधील युवक-युवतींसाठी भव्य नौकरी भरती मेळाव्याचे आयोजन केले असून या मेळाव्याय उपस्थित राहणाऱ्या प्रत्येकास शंभर टक्के नौकरीची संधी मिळणार आहे. याबरोबरच जागेवर नियुक्तीपत्र देखील देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे नौकरी मिळवण्यासाठी कोणत्याच उमेदवारवारास पैशांची आवश्यकता भासणार नाही. बीडमधील तरुण वर्गाने जास्तीतजास्त संख्येने नोकरी भरती मेळाव्यात प्राधान्याने उपस्थित राहून नौकरीची संधी प्राप्त करावी असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी केले आहे.
Leave a Reply