बीड – बीड जिल्ह्यात अलीकडच्या काळात पत्रकारितेसारख्या पवित्र क्षेत्रात अनेक हौसे, नवसे अन गवसे आल्याने हे क्षेत्र बदनाम होऊ लागले आहे. पत्रकार म्हणून मिरवताना अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करायचे, ठरलेली रक्कम न मिळाल्यास त्या अधिकाऱ्या विरोधात बातम्या छापून आणायच्या असले उद्योग सुरु झाल्याने पत्रकारिता बदनाम होऊ लागली आहे.
पत्रकार अन वर्तमानपत्र म्हटलं कि आजही लोक आदराने पाहतात, मात्र अलीकडच्या काळात बीड जिल्ह्यात दगड काढला कि पत्रकार सापडतो अशी अवस्था झाली आहे.
कोणीही उठतो अन पत्रकार होतो, ज्याला त्याचे शैक्षणिक ज्ञान नाही, अभ्यास नाही अशा लोकांच्या गळ्यात पत्रकार म्हणून कार्ड दिसते अन अशा लोकांचा शासकीय कार्यालयात अन पुढऱ्यांकडे मोठा राबता दिसून येतो.
कुणीही उठायचे अन कोणत्या तरी दैनिकांचे प्रतिनिधी असल्याचे मिरवायचे किंवा युट्युब चॅनेल काढून लोकांना ब्लॅकमेल करायचे असले उद्योग वाढले आहेत.
बर हे ब्लॅकमले करणारे केवळ नवखेच आहेत असं नाही तर राज्य आणि विभागीय पातळीवरून प्रकाशित होणाऱ्या दैनिकांचे जिल्हा आणि तालुका पातळीवरील प्रतिनिधी देखील अशाच पद्धतीने अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करत असल्याचे दिसत आहे.
पोलीस आणि महसूल प्रशासनातील अधिकारी हे सर्वात जास्त लाच घेतात, त्यामुळे एखादी कारवाई झाली कि त्यात संबंध नसलेल्या अधिकाऱ्यांच्या नावाने बातम्या करायच्या अन नंतर मांडवली करायची असले उद्योग बीडमध्ये सुरु झाले आहेत.
ग्रामीण भागातील काही पत्रकार तर दोन दोन महिन्यापूर्वी घडलेल्या घटनेच्या बातम्या टाईप करून अधिकाऱ्यांना टाकतात त्यानंतर तोडीपाणी झाली तर ठीक नाहीतर विभागीय किंवा जिल्हा दैनिकांना पाठवून मोकळे होतात, त्यानंतर जिल्हा प्रतिनिधी त्या अधिकाऱ्याला फोन करून आपले अन बातमीदाराचे मिळून रक्कम सांगतो अन ती न दिल्यास अधिकाऱ्या विरोधात रान पेटवले जाते.
सध्या बीड जिल्ह्यात मागील काही दिवसात घडून गेलेल्या काही घटनांचा संदर्भ घेऊन पोलीस अधिकाऱ्यांना अन महसूल अधिकाऱ्यांना जाणीवपूर्वक टार्गेट करण्याचे उद्योग या असल्या टारगट पत्रकारांकडून सुरु आहेत मक्तर त्यामुळे इमानदार पत्रकारांना मान खाली घालण्याची वेळ आली आहे.
Leave a Reply