बीड -शहरातील सम्राट चौक भागात असलेल्या साई अर्बन क्रेडिट सोसायटी ला गेल्या दोन महिन्यापासून कुलूप लागल्याने ठेवीदार हवालदिल झाले आहेत. विशाल ढगे हा चेअरमन फरार झाल्याने जवळपास एक ते दीड कोटी रुपये अडकल्याने ठेवीदार हैराण झाले आहेत.
बीड येथील विशेष लेखा परीक्षक कार्यालयात नोकरीस असलेल्या श्रीकृष्ण ढगे यांनी मुलगा विशाल ढगे याला साई अर्बन क्रेडिट को ऑपरेटिव्ह सोसायटी सुरु करून दिली.
पिंपरगव्हाण रोडवरील जवळच्या, ओळखीच्या तसेच नातेवाईक यांच्याकडून मोठ्या प्रमाणात ठेवी गोळा केल्या. दोन अडीच वर्ष व्यवहार सुरळीत सुरु होता. मात्र दोन महिन्यापूर्वी अचानक ही क्रेडिट सोसायटी अडचणीत आली.
दोन महिन्यापासून चेअरमन आणि त्याचे संचालक,तसेच श्रीकृष्ण ढगे हे बिडमधून गायब झाले आहेत.
या प्रकरणात सहकार विभागाकडे तक्रार झाल्यानंतर तालुका निबंधक यांनी यावर प्रशासक नियुक्त केला आहे. त्यांच्याकडून चौकशी सुरु झाली आहे. मात्र कार्यालयात कोणतीच माहिती उपलब्ध नसल्याने ठेवीबाबत अडचणी येत आहेत.












Leave a Reply