बीड – शेतकरी बांधवांची, सहकाराच्या माध्यमातून समृध्दी व्हावी या उद्देशाने अनेक अडचणींतून मार्ग काढत गजानन साखर सुरू केला आहे. तालुक्यासह आजुबाजूच्या भागातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना हक्काचा कारखाना उपलब्ध झाला आहे. असे प्रतिपादन आ.संदीप क्षीरसागर यांनी गजानन साखर कारखान्याच्या गाळप हंगामाच्या रोलर पूजनाच्या कार्यक्रमात केले.
गजानन साखर कारखान्याच्या गाळप हंगाम २०२४-२५ च्या मिल रोलर पूजनाचा कार्यक्रम बुधवारी (दि.३१) रोजी पार पडला. मागील तीन वर्षांपूर्वी अनेक अडचणी आणि आव्हानांना मात देत आ.संदीप क्षीरसागर यांनी गजानन साखर कारखाना सुरू केला आहे. शेतकरी आणि सर्वसामान्य सभासदांच्या पाठबळावर गेल्या दोन गाळप हंगामात यशस्वीपणे ऊसाचे गाळप करून भागातील हजारो ऊस उत्पादक शेतकऱ्यांना झाला आहे. आता येणार्या २०२४-२५ गाळप हंगामातही जास्तीत जास्त ऊसाचे वेळेत गाळप करण्यासाठी कारखाना प्रशासन तत्पर असणार आहे. ऊस उत्पादक शेतकरी बांधवांना हक्काचा कारखाना, आपल्या प्रयत्नांतून उपलब्ध झाल्याचे मनस्वी समाधान असल्याच्या भावना आ.क्षीरसागर यांनी व्यक्त केल्या. मिल रोलर पूजनाच्या कार्यक्रमासाठी आ.संदीप क्षीरसागर यांच्यासह महंत अमृतदासजी जोशी महाराज, माजी आ.सय्यद सलीम तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर, कारखाना प्रशासनाचे अधिकारी-कर्मचारी, पंचक्रोशीतील शेतकरी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Leave a Reply