News & View

ताज्या घडामोडी

जिल्हा परिषदेतील बोगस दिव्यांगावर कारवाईला मुहूर्त कधी!

बीड – यूपीएससी मध्ये बोगस अपंग प्रमाणपत्र  सादर करून कलेक्टर बनलेल्या पूजा खेडकर प्रमाणे शेकडो कर्मचारी बीड जिल्हा परिषदेत बोगस अपंग प्रमाणपत्र देऊन नोकरीस लागले आहेत, मात्र प्रशासन आणि पुढारी यांची पाठराखण असल्याने या कर्मचाऱ्यांवर कसलीच कारवाई होत नाही.

पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात गोंधळ घालून आपल्या आयुष्यात गोंधळ उडवून देणाऱ्या पूजा खेडकर हिच्या बोगस अपंग प्रमाणपत्र प्रकरणानंतर बहुतांश शासकीय कार्यालयात झालेल्या भरतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

बीड जिल्हा परिषदेत तत्कालीन सिइओ अजित पवार यांनी अपंग प्रमाणपत्राचा लाभ घेतलेल्या शिक्षकांचे प्रमाणपत्र तपासण्याचा फार्स केला होता, तेव्हा एकच खळबल उडाली होती. मात्र त्यावर कारवाई काहीच झाली नाही. आजही बीड जिल्हा परिषदेच्या शिक्षण, आरोग्य, बांधकाम, एफ डि, पाणी पुरवठा, कृषी, पशुसंवर्धन, अशा जवळपास सतरा विभागत शेकडो कर्मचारी बोगस अपंग प्रमाणपत्राच्या आधारावर नोकरीला लागले आहेत. मात्र त्यांच्यावर कोणतीच कारवाई झालेली नाही.

पूजा खेडकर प्रकरण उघडकीस आल्यानंतर आता बीड जिल्हा परिषदेच्या प्रभारी सिइओ संगीता पाटील यांनी या सगळ्या प्रमाणपत्रांची तपासणी करण्यासाठी पुढाकार घेतल्यास शेकडो बोगस अपंग बाहेर पडतील असा अंदाज व्यक्त केला जातं आहे.

बीड जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात सुभाष सोनवणे नावाचा शिपाइ दोन वर्षांपूर्वी रुजू झाला, तो कर्णबधिर या संवर्गातून रुजू झाला. मात्र तत्कालीन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अमोल गित्ते आणि विद्यमान डॉ उल्हास गंडाळ यांनी त्याचे मेडिकल करण्यासाठी कोणताही प्रयत्न केला नाही.नोकरीत रुजू झाल्यानंतर सहा महिन्यात मेडिकल करावे लागते मात्र सोनवणे चे प्रकरण दोन वर्षांपासून पेंडिंग ठेवण्यामगे नेमका कोणाचा स्वार्थ आहे याची सुद्धा चौकशी करण्याची गरज आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *