Bid-bid विधानसभा मतदार संघांचे आ संदीप क्षीरसागर आणि सर्वच क्षीरसागर यांच्यामुळे बीड शहरात विकास कामांना स्थगिती मिळाली असल्याचा आरोप शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल जगताप आणि सचिन मुळूक यांनी केला.
बीड येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शहरातील स्वराज्य नगर भागात दिन कोटी रुपयाच्या विकास कामांना आमदार संदीप क्षीरसागर यांनी स्थगिती आणली, त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याने शहरातील विकास कामांना खिळ बसला आहे असा आरोप जगताप, मुळूक यांनी केला.
नगर परिषद मध्ये सध्या प्रशासक असला तरी सत्ता अन शब्द क्षीरसागर यांचाच चालतो असेही मुळूक यांनी म्हटले. बीड शहरातील अनेक समस्या मुळे नागरिक हैराण झाले आहेत, या विरुद्ध आम्ही मुख्यमंत्री अन सरकारकडे दाद मागणार असल्याचेही या दोघांनी सांगितले.
Leave a Reply