परळी – जुन्या वादाच्या कारणावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे राज्य उपाध्यक्ष बबन गित्ते, महादेव गित्ते यांच्यासह इतरांनी परळी शहरातील बँक कॉलनी भागात गोळीबार करत बापू आंधळे यांचा खून केला. या प्रकरणी गित्ते यांच्यावर 302 नुसार गुन्हा दाखल झाला आहे.
परळी तालुक्यातील मरळवाडी येथील सरपंच बापू आंधळे यांचे आणि बबन गित्ते यांचे जुने भांडण होते. पैशाच्या देवाणघेवानी वरून देखील या दोघात अनेकदा वाद झाले होते.
- भाजप लावणार प्रत्येक बूथवर पाच झाडं -जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख यांचा निर्धार!
- आजचे राशीभविष्य!
- खोमणेनी वरिष्ठ अधिकारी मॅनेज केले!एसडीएम मॅडमचे अर्थपूर्ण दुर्लक्ष!
- आजचे राशीभविष्य!
- कीर्तिरूपी उरावे………!
दरम्यान लोकसभा निवडणुकी नंतर या दोघांमधील वाद अधिकच टोकाला गेला. लोकसभा निवडणुकीत आंधळे हा धनंजय मुंडे यांच्या गटात असल्याने गित्ते यांनी त्याला अनेकदा जाब विचारला होता.
दरम्यान शनिवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास बँक कॉलनी भागात बबन गित्ते, महादेव गित्ते यांच्यासह इतरांनी बापू आणि त्याच्या काही सहकाऱ्यांना बोलावून घेत गोळ्या घातल्या. यामध्ये आंधळे याचा जागीच मृत्यू झाला तर अन्य एक जण जखमी झाला.
बबन गित्ते यांनी काही महिन्यापूर्वी शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांच्यावर प्रदेश उपाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली होती. गित्ते आणि धनंजय मुंडे यांचे कार्यकर्ते वाल्मिक कराड यांच्यात गेल्या अनेक वर्षांपासून वैर आहे.





Leave a Reply