परळी – जुन्या वादाच्या कारणावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे राज्य उपाध्यक्ष बबन गित्ते, महादेव गित्ते यांच्यासह इतरांनी परळी शहरातील बँक कॉलनी भागात गोळीबार करत बापू आंधळे यांचा खून केला. या प्रकरणी गित्ते यांच्यावर 302 नुसार गुन्हा दाखल झाला आहे.
परळी तालुक्यातील मरळवाडी येथील सरपंच बापू आंधळे यांचे आणि बबन गित्ते यांचे जुने भांडण होते. पैशाच्या देवाणघेवानी वरून देखील या दोघात अनेकदा वाद झाले होते.
- थर्मल च्या जागेत सौर ऊर्जा प्रकल्प उभारणीस मान्यता!
- गुळभीले दांपत्याचा आदर्श निर्णय!
- आजचे राशीभविष्य!
- फुलारीनी मोठा डाव हाणला!टीईटी घोटाळ्यातील शिक्षकांना दिल्या नियुक्त्या!
- आजचे राशीभविष्य!
दरम्यान लोकसभा निवडणुकी नंतर या दोघांमधील वाद अधिकच टोकाला गेला. लोकसभा निवडणुकीत आंधळे हा धनंजय मुंडे यांच्या गटात असल्याने गित्ते यांनी त्याला अनेकदा जाब विचारला होता.
दरम्यान शनिवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास बँक कॉलनी भागात बबन गित्ते, महादेव गित्ते यांच्यासह इतरांनी बापू आणि त्याच्या काही सहकाऱ्यांना बोलावून घेत गोळ्या घातल्या. यामध्ये आंधळे याचा जागीच मृत्यू झाला तर अन्य एक जण जखमी झाला.
बबन गित्ते यांनी काही महिन्यापूर्वी शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांच्यावर प्रदेश उपाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली होती. गित्ते आणि धनंजय मुंडे यांचे कार्यकर्ते वाल्मिक कराड यांच्यात गेल्या अनेक वर्षांपासून वैर आहे.
Leave a Reply