बीड -कथित व्हॉइस क्लिप प्रकरणात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांचे कार्यालय अज्ञात लोकांनी दगडफेक करून फोडले.
कुंडलिक खांडे यांची एक व्हॉइस क्लिप गुरुवारी दुपारी व्हायरल झाली, ज्यामध्ये ते स्वतः आपण बजरंग सोनवणे यांचे काम केले, पंकजा मुंडे यांना धोका दिल्याचे सांगत आहेत. ही क्लिप व्हायरल झाल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद उमटले.
- बोगस शिक्षक भरती घोटाळ्यात भाजपच्या माजी खासदाराचा भाऊ!
- आजचे राशीभविष्य!
- आजचे राशीभविष्य!
- नागपूर घोटाळा प्रकरणी आष्टीच्या माजी गटशिक्षणाधिकारी यांना अटक!
- शिक्षक भरती घोटाळ्यात शिक्षण मंडळाच्या अध्यक्षाना अटक!
बीड येथील जालना रोडवर असलेल्या नवगण प्लाझा या इमारती मध्ये असलेले खांडे यांचे जिल्हा कार्यालय काही जणांनी तुफान दगडफेक करत फोडले.
खांडे आणि शिवराज बांगर यांच्यातील संवादाची क्लिप व्हायरल झाल्यानंतर यात आपला आवाज नसल्याचा दावा बांगर यांनी केला होता. त्यानंतर सायंकाळच्या सुमारास दगडफेकीची घटना घडली.
Leave a Reply