News & View

ताज्या घडामोडी

बालनाट्य शिबिरातून नवी ऊर्जा मिळते- दिपाताई क्षीरसागर !

बीड -अठरावे बालनाट्य शिबिर हे नवी दिशा देणारे ऊर्जा देणारे ठरले आहे. नाटकाच्या सर्वांगीण विकासासाठी बालकांनी तंत्रज्ञाचे धडे गिरवले, मूकनाट्या सारख्या कला प्रकाराची सखोल माहिती या शिबिरात बालकलावंतांना मिळाली. मनोगतातून व्यक्त होणाऱ्या पालकांच्या, शिबिराथांच्या प्रतिक्रिया या आम्हास प्रेरणा देतात आणि उत्साह वाढवतात असे प्रतिपादन समारोपप्रसंगी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. दीपाताई क्षीरसागर यांनी केले यावेळी मंचावरती डॉ. विद्यासागर पटांगणकर, डॉ. उज्वला वनवे, डॉ. संजय पाटील देवळाणकर उपस्थित होते.


अठराव्या बालनाट्य शिबिराचा समारोप आज मान्यवरांच्या हस्ते झाला यावेळी नाटकाच्या निर्मितीची गोष्ट, झाडे लावा प्राणवायू घ्या प्राण वाचवा , मोबाईलचा अतिरेक हे मूकनाट्य सादर केले , भारतीय नारी,(प्रतीक्षा क्षीरसागर , कोमुदी रुईकर)हे नाट्य छटा तर संकेत खेडकर यांनी द मटरेलॅस्टिक क्यूब हे मूकनाट्य सादर केले.


याप्रसंगी डॉ. विद्यासागर पाटांगणकर यांनी सर्व शिबिरार्थ्यांचे कौतुक केले.
यावेळी लक्ष्मीकांत रुईकर, श्रीकृष्ण शेळके, डॉ. रसिका पारगावकर, सुरभी निराळे, देवांश कोलंगडे, कोमुदी रुईकर आदींनी मनोगत व्यक्त करताना शिबिराबद्दल समाधान व्यक्त केलं तर शिबिर 15 दिवस किंवा एक महिना चालावं अशी अपेक्षा व्यक्त केली.


शिबिरार्थ्यांना संकेत खेडकर, दुष्यंता रामटेके, लक्ष्मीकांत दोडके, डॉ. उज्वला वनवे, अक्षय फुलझळके मिलिंद शिवनीकर रुक्मिणीकांत पांडव आदींनी प्रशिक्षण दिले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन मिलिंद शिवनीकर यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. संजय पाटील देवळाणकर यांनी मानले. शिबिरासअमोल गायकवाड, निलेश लोंढे, अभिषेक दळवी, अंकुर तांगडे, प्रदीप मुळे, अनिता शिंदे यांचे सहकार्य लाभले


या शिबिरात राज काळकुटे,सृजना देवगिरे, मैथिली शिवणीकर, स्वरा देशपांडे, धनश्री पानसकर, नारायणी रोडे, सई औटी, मृदुला केकान, प्राची गंभीरे, मैत्रीयी पाटोदकर, अथर्व शेळके, अभिनय राठोड, चैतन्य जोशी, कैवल्य तालखेडकर, कार्तिक कोलंगडे, गौरी जेवंजाळ, अर्णव पाटोदकर, प्रज्वल गंभीरे, शौर्य लक्ष्मीकांत सौंदत्तीकर, देवांश गलंगडे, रामेश्वर शेटे, आगाम नहार, अमृता शेळके, कौमुदी रुईकर, प्रतीक्षा क्षीरसागर, अदिती चव्हाण, राजनंदिनी बांगर, सुरभी निराळे, पूरभी पाटसकर,ओम भिंगारे, ग्रीष्म अगरवाल, पलाक्षी अग्रवाल, रिदेशा तुपे, आर्या दोडके, स्वरा दोडके आदींनी सहभाग नोंदवला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *