बीड – बीडच्या समाजकल्याण कार्यालयात एका अधिकाऱ्याला बायको अन काही महिलांनी मारहाण केल्याने एकच खळबळ उडाली आहे.
शहरातील सामाजिक न्याय भवन इमारती मध्ये असलेल्या समाजकल्याण कार्यालयात एका अधिकाऱ्याला त्याच्या बायकोने काही महिलांना सोबत घेत मारहाण केली. सायंकाळी साडेचार पाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
या अधिकाऱ्याने दुसरे लग्न केले असल्याने काही दिवसापासून त्याच्या घरात वाद सुरु होते. अनेकवेळा सांगून देखील अधिकाऱ्याच्या अर्थात पतीच्या वागण्यात काहीच फरक पडत नसल्याने शेवटी सोमवारी सायंकाळी त्याची पत्नी कार्यालयात आली. सोबत असलेल्या पाच दहा महिलांनी या अधिकाऱ्याला चांगलाच चोप दिला.
- कासलेची फेकाफेकी उघड!निवडणूक विभागाकडून गुन्हा दाखल!
- पोलीस पाटलांची भरती सुरु!
- आजचे राशीभविष्य!
- बडतर्फ कासले विरुद्ध पोलिसात तक्रार!
- आजचे राशीभविष्य!
विशेष बाब म्हणजे या अधिकाऱ्याचा आज वाढदिवस होता. वाढदिवसाचे चांगलेच गिफ्ट भेटल्याची चर्चा या घटनेनंतर सुरु होती.
Leave a Reply