बीड – संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या बीड लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात अनर्क घटना घडामोडी घडल्या. अत्यन्त अटीटतीची झालेली ही निवडणूक कोण जिंकणार हे सांगणे कठीण झाले होते.पहिल्या फेरीत केज, गेवराई, बीड मध्ये पंकजा मुंडे पिछाडीवर आहेत तर परळी आणि आष्टी मतदारसंघात त्या आघाडीवर आहेत.बजरंग सोनवणे हे पहिल्या फेरीत 1359मल मतांनी आघाडीवर आहेत.
दरम्यान मतमोजणीच्या दिवशी कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी जिल्हाभरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
मंगळवारी सकाळी आठ वाजता मतमोजणी सुरु झाली. पोस्टल आणि बॅलेट युनिट वरील मतांची मोजणी सुरु झाली.
पहिल्या फेरीत पंकजा मुंडे यांनी परळी मतदारसंघात 850 मतांची आघाडी घेतली.आष्टी मतदारसंघात 1300 मतांची आघाडी घेतली आहे.
Leave a Reply