बीड- ज्ञानराधा मल्टिस्टेट पतसंस्थेत ठेवलेल्या तब्बल अकरा लाख रुपयांच्या ठेवी वेळेत परत न करता अपहार केल्याप्रकरणी ज्ञानराधा मल्टिस्टेट पतसंस्थेचे चेअरमन सुरेश कुटे,अर्चना कुटे यांच्यासह इतरांवर कलम 420 व इतर कलमानुसार पेठ बीड पोलिसात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कुटे सध्या फरार असल्याचा आरोप ठेवीदारांनी केला आहे.
बीड सह राज्यात आणि इतर राज्यात 51 शाखांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा आर्थिक व्यवहार असलेल्या ज्ञानराधा मल्टिस्टेट पतसंस्थेत गेल्या आठ महिन्यापासून आर्थिक गडबड सुरू आहे.
पतसंस्थेच्या सर्वच शाखा बंद पडल्या असून सुरेश कुटे हे पैसे देण्यास टाळाटाळ करत आहेत.त्यामुळे ठेवीदारांनी वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली आहे.
बीड शहरातील पेठ बीड पोलिसात चंद्रकांत वामनराव कुलकर्णी आणि स्वाती रवींद्र कानडे यांनी दोन वेगवेगळे तक्रार अर्ज दाखल केले आहेत.ज्यामध्ये सुरेश कुटे, यशवंत कुलकर्णी, अर्चना कुटे,नारायण शिंदे,सुशील हाडुळे,श्रीकांत आमटे या लोकांवर कलम 420 नुसार गुन्हा दाखल झाला आहे.
सुरेश कुटे यांच्यावर पेठ बीड, बीड शहर,शिवाजीनगर अशा वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत.एकीकडे कुटे हे अज्ञात स्थळी बसून फेसबुक वरून लोकांना गुन्हे दाखल न करण्याचे आवाहनकरत लवकरच पैसे मिळतील असे सांगत आहेत तर दुसरीकडे पोलिसांना मात्र कुटे सापडत नसल्याची माहिती आहे.
- बोगस शिक्षक भरती घोटाळ्यात भाजपच्या माजी खासदाराचा भाऊ!
- आजचे राशीभविष्य!
- आजचे राशीभविष्य!
- नागपूर घोटाळा प्रकरणी आष्टीच्या माजी गटशिक्षणाधिकारी यांना अटक!
- शिक्षक भरती घोटाळ्यात शिक्षण मंडळाच्या अध्यक्षाना अटक!
कुटे ज्या ठिकाणावरून फेसबुक लाईव्ह करत आहेत तो नंबर ट्रेस करून सायबर विभागामार्फत त्यांचे लोकेशन सहज मिळू शकते मात्र पोलिस अद्यापही कुठलीच कारवाई करत नसल्याने त्यांच्या कारभारावर शंका उपस्थित केली जात आहे.
Leave a Reply