News & View

ताज्या घडामोडी

सात कोटींची फसवणूक, चंदूलाल बियाणीसह इतरांवर गुन्हा दाखल !

बीड- राजस्थानी मल्टिस्टेट पतसंस्थेत ठेवीदारांनी ठेवलेल्या कोट्यवधी रुपयांच्या ठेवींचा अपहार केल्याप्रकरणी अध्यक्ष चंदूलाल बियाणी यांच्यासह संचालक मंडळावर गुन्हा दाखल झाला आहे एकीकडे बियाणी यांच्यावर गुन्हा दाखल झाला असताना सुरेश कुटे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यास मात्र पोलीस टाळाटाळ करत असल्याचे चित्र आहे.

बिभीषण तिडके यांनी त्यांचे बारा लाख रुपये राजस्थानी मल्टिस्टेट मध्ये ठेवले होते.मात्र वारंवार मागणी करून देखील रक्कम मिळत नसल्याने तिडके यांनी पोलिसात धाव घेतली. रात्रभर तिडके यांच्यासह शेकडो ठेवीदार पोलीस ठाण्यात बसून होते.

अखेर पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास चंदूलाल बियाणी,भालचंद्र लोढा,बद्रीनारायन बाहेती,अभिषेक बियाणी,प्रल्हाद अग्रवाल,विजय लड्डा,अशोक जाजू,सतीश सारडा,प्रेमलता बाहेती,कल्पना बियाणी,नामदेव रोडे,जगदीश बियाणी,व्ही बी कुलकर्णी,तुषार गायकवाड, कांबळे मॅडम,प्रदीप मुरकुटे आणि राजेश मोदानी यांच्यावर फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एकीकडे साडेसात कोटींची फसवणूक केली म्हणून परळी पोलिसात बियाणी यांच्यावर गुन्हा दाखल केला जात असताना बीड जिल्ह्यातील अनेक पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज देऊनही पोलीस सुरेश कुटे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *