बीड- तब्बल एक कोटी रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक हरिभाऊ राठोयाच्या घरी एक कोटी रुपये रोख रकमेसह साडेपाच किलो चांदी आणि जवळपास साडेआठ तोळे सोने सापडले.यातील पो कॉ जाधवर यांच्या घरी 25 तोळे सोने आणि रोख रक्कम आढळून आली.
शहरातील माँ जिजाऊ पतसंस्थेचे कंत्राटदार यांना आरोपी न करण्यासाठी एक कोटी रुपयांची लाच आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक खाडे आणि पो कॉ जाधवर यांनी मागितली होती. यातील पाच लाख रुपयांची लाच खाजगी इसम कुशल प्रवीण जैन याच्या मार्फत स्वीकारताना एसीबी ने अटक केली होती.
- बोगस शिक्षक भरती घोटाळ्यात भाजपच्या माजी खासदाराचा भाऊ!
- आजचे राशीभविष्य!
- आजचे राशीभविष्य!
- नागपूर घोटाळा प्रकरणी आष्टीच्या माजी गटशिक्षणाधिकारी यांना अटक!
- शिक्षक भरती घोटाळ्यात शिक्षण मंडळाच्या अध्यक्षाना अटक!
या प्रकरणानंतर खाडे आणि जाधवर फरार झाले .त्याचे घर एसीबीने सील केले होते.न्यायालयाच्या आदेशानुसार घर सर्च केले असता बीड येथील घरी एक कोटी साडेआठ लाख रोख रक्कम,साडेआठ तोळे सोने,साडेपाच किलो चांदी आढळून आली.जाधवर याच्या घरी 22 तोळे सोने आणि रोख 18 हजार रुपये सापडले.
दरम्यान खाडे आणि जाधवर या दोघांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
Leave a Reply