बीड- एक कोटी रुपयांची लाच मागून पाच लाख रुपये मध्यस्थांमार्फत स्वीकारल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर फरार असलेले आर्थिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक हरिभाऊ खाडे यांचे बीड येथील घर एसीबी ने सील केले आहे.खाडे यांच्या शोधासाठी पथके रवाना झाली आहेत.
बीड येथील माँ जिजाऊ पतसंस्थेचे प्रकरणात गुन्हा दाखल न करण्यासाठी एक कोटी रुपयांची लाच आर्थिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक हरिभाऊ खाडे यांनी मागितली होती.कुशल प्रवीण जैन उर्फ मौजकर यांच्या मौजकर टेक्स्टाईल या सुभाष रोडवरील दुकानात तक्रारदाराने पाच लाख रुपये घेताना एसीबीने अटक केली होती.
पोलीस निरीक्षक खाडे आणि पो कॉ जाधवर हे दोघे फरार झाले आहेत.दरम्यान एसीबीने खाडे यांच्या बळीराजा कॉम्प्लेक्स मधील घराची झडती घेण्याचा प्रयत्न केला. परंतु ते घरी नसल्याने घर सील करून त्या ठिकाणी बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
- आजचे राशीभविष्य!
- आजचे राशीभविष्य!
- घाटनांदूर मध्ये राडा, जिल्हाधिकारी यांचे कठोर कारवाईचे आदेश!
- आजचे राशीभविष्य!
- आ क्षीरसागर यांची बदनामी, बीडमध्ये गुन्हा दाखल!
खाडे यांच्या गावाकडील घरची देखील झडती घेण्यात येणार आहे.त्यांच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना झाली आहेत.
Leave a Reply