बीड- गावाकडं जाऊन कमळाला मतदान का केले म्हणून कुर्ला येथील अशोक राऊतमारे यांच्या कुटुंबावर गावातील काही लोकांनी बीडच्या घरात घुसून हल्ला केला.दगडफेक करत घरातील सामानाची नासधूस केली.या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
सोमवारी 13 मे रोजी बीड लोकसभा निवडणूक साठी मतदान झाले.बहुतांश ठिकाणी शांततेत मतदान झाले.मात्र सोमवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास बीड शहरातील पिंपरगव्हाण भागात राहणारे अशोक राऊतमारे यांच्या घरावर काही जणांनी हल्ला केला.
तू ब्राम्हण आहेस म्हणून तू कमळाला मतदान केले,कमळाला मतदान का केले म्हणून अनिल पांडुरंग पाटील,दादा सोनवणे,दादा यादव आणि अन्य दोन जणांनी घरात घुसून बेदम मारहाण केली.घरावर तुफान दगडफेक करत सामानाची नासधूस केली.
- घरकुल च्या नावाखाली शंभर कोटींचा वाळू उपसा!एस आय टी चौकशीची आ पंडित यांची मागणी!
- आजचे राशीभविष्य!
- अंबडचा लाचखोर तहसीलदार चव्हाण एसीबी च्या जाळ्यात!
- आजचे राशीभविष्य!
- भाजप लावणार प्रत्येक बूथवर पाच झाडं -जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख यांचा निर्धार!
या गंभीर प्रकरणानंतर संबंधित आरोपीवर कलाम 307 सह अन्य कलमा नुसार गुन्हे दाखल झाले आहेत.





Leave a Reply