बीड- गावाकडं जाऊन कमळाला मतदान का केले म्हणून कुर्ला येथील अशोक राऊतमारे यांच्या कुटुंबावर गावातील काही लोकांनी बीडच्या घरात घुसून हल्ला केला.दगडफेक करत घरातील सामानाची नासधूस केली.या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
सोमवारी 13 मे रोजी बीड लोकसभा निवडणूक साठी मतदान झाले.बहुतांश ठिकाणी शांततेत मतदान झाले.मात्र सोमवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास बीड शहरातील पिंपरगव्हाण भागात राहणारे अशोक राऊतमारे यांच्या घरावर काही जणांनी हल्ला केला.
तू ब्राम्हण आहेस म्हणून तू कमळाला मतदान केले,कमळाला मतदान का केले म्हणून अनिल पांडुरंग पाटील,दादा सोनवणे,दादा यादव आणि अन्य दोन जणांनी घरात घुसून बेदम मारहाण केली.घरावर तुफान दगडफेक करत सामानाची नासधूस केली.
- बोगस शिक्षक भरती घोटाळ्यात भाजपच्या माजी खासदाराचा भाऊ!
- आजचे राशीभविष्य!
- आजचे राशीभविष्य!
- नागपूर घोटाळा प्रकरणी आष्टीच्या माजी गटशिक्षणाधिकारी यांना अटक!
- शिक्षक भरती घोटाळ्यात शिक्षण मंडळाच्या अध्यक्षाना अटक!
या गंभीर प्रकरणानंतर संबंधित आरोपीवर कलाम 307 सह अन्य कलमा नुसार गुन्हे दाखल झाले आहेत.
Leave a Reply