बीड -जिल्ह्यात विविध भागात गुरुवारी दुपारी वादळीवार्यासह जोरदार अवकाळी पाऊस झाला तर धारुर, वडवणी व गेवराई तालुक्यात गारा बसरल्या. यामुळे पिकांसह फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.दरम्यान गुरुवारी झालेल्या गारपीटीचे तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश देण्यात आले असून मदत आचारसंहिता संपल्यावर मिळेल अशी माहिती कृषिमंत्री तथा पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.
सकाळच्या सत्रामध्ये अनेक भागामध्ये ढगाळ वातावरण होते परंतु दुपारी तीन ते चार या वेळेत अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस झाला. अचानक आलेल्या पावसाने अनेकांची त्रेधातिरपिट उडली परंतु या पावसामुळे वातावरण थंडावा निर्माण झाल्याने थोडासा दिलासा मिळाला.
- आजचे राशीभविष्य!
- आजचे राशीभविष्य!
- शिंदे यांचा मोठा निर्णय!
- बांधकाम विभागाच्या शिंदेचे प्रमोशन वादात!
- आजचे राशीभविष्य!
गेवराई तालुक्यात झालेल्या अवकाळी पावस व वादळी वार्यामुळे झाडे उन्मळुन पडली तर काही ठिकाणचे नुकसान झाले. धारुर-वडवणी रस्त्यावर पहाडी दहिफळ येथे मोठे झाड पडल्याने काही वेळ वाहतुक बंद होती. उन्हाळी ज्वारी व बाजरीचे सुद्धा अवकाळी पावसामुळे नुकसान झाले आहे. बीड शहरात दुपारी चार वाजण्याच्या सुमारास वादळी वार्याचा पाऊस झाला परंतु नोंद घ्यावी असा पाऊस झाला नाही.
Leave a Reply