केज-लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केज तालुक्याच्या दौऱ्यावर असलेल्या भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे यांची गाडी मराठा आंदोलकांनी अडवली.यावेळी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला.पोलीस संरक्षणात मुंडे यांची गाडी बाहेर काढून देण्यात आली.
बीड लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवार म्हणून पंकजा मुंडे या गेल्या आठवडा भरापासून प्रचाराला लागल्या आहेत.बुधवारी केज तालुक्यातील दौऱ्यावर असताना पावनधाम येथील अखंड हरिनाम सप्ताहाला उपस्थित राहण्यासाठी पंकजा मुंडे गेल्या होत्या.
पंकजा मुंडे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर केज पोलिसांनी काही आंदोलकांना नोटीस दिल्या होत्या.यापूर्वी साक्षाळपिंप्री येथे मुंडे यांच्या गाडीसमोर काही आंदोलकांनी काळे झेंडे दाखवले होते,त्यामुळे पोलिसांनी खबरदारी म्हणून केज मधील काही आंदोलकांना नोटीस दिल्या होत्या.
- बांधकाम विभागातील लाचखोर जेरबंद!
- थर्मल च्या जागेत सौर ऊर्जा प्रकल्प उभारणीस मान्यता!
- गुळभीले दांपत्याचा आदर्श निर्णय!
- आजचे राशीभविष्य!
- फुलारीनी मोठा डाव हाणला!टीईटी घोटाळ्यातील शिक्षकांना दिल्या नियुक्त्या!
त्यानंतर बुधवारी पंकजा मुंडे यांच्या गाडीसमोर काही कार्यकर्ते जमा झाले,रस्त्यावर गाडी अडवत या आंदोलकांनी एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देत आंदोलन केले.यावेळी आंदोलक ऐकत नाहीत हे लक्षात आल्यावर पोलिसांनी सौम्य लाठीमार केला.
Leave a Reply