News & View

ताज्या घडामोडी

विजय पवार यांचा धिंगाणा !

बीड येथील प्रोफेशनल क्लासेस चे प्रमुख तथा संत ज्ञानेश्वर इंग्लिश स्कूलचे संस्थाचालक विजय पवार यांनी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात जाऊन महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना अर्वाचे भाषा वापरत चांगलाच धिंगाणा केला ही घटना जिल्हा परिषदेत दुपारी घडल्यानंतर एकच खळबळ उडाली याबाबत कर्मचाऱ्यांनी शिक्षणाधिकारी यांच्याकडे तक्रार दिली आहे

विजय पवार हे आपल्या काही सहकाऱ्यांसोबत जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीत असलेल्या शिक्षण विभागाच्या कार्यालयात गेले त्यावेळी शिक्षणाधिकारी यांचे दालन बंद होते त्यांनी तेथे उपस्थित असलेल्या महिला अधिकारी यांनी कर्मचाऱ्यांना शिक्षण अधिकारी कुलकर्णी कोठे गेले आहेत नारायण स्कूल वर अद्याप कारवाई का झाली नाही असे म्हणत कुलकर्णी यांच्या दालनाच्या दरवाज्यावर लाथा घालून तो तोडण्याचा प्रयत्न केला

तसेच महिला अधिकारी आणि उपस्थित कर्मचाऱ्यांना अर्वाचे भाषा वापरत असाभ्यवर्तन केले हा सगळा प्रकार पाहून उपस्थित कर्मचारी आणि कामासाठी आलेले नागरिक आवाक झाले याबाबत कर्मचाऱ्यांनी शिक्षणाधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार केली असून विजय पवार यांच्या विरोधात पोलिसातही धाव घेण्यात आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *