बीड- शहरातील वासनवाडी शिवारातील वादग्रस्त फेरफार रद्द करण्याचे आदेश देत उपविभागीय अधिकारी यांनी मंडळ अधिकारी सचिन सानप यांना दणका दिला आहे.या प्रकरणात ऍड दीपक कुलकर्णी यांनी गेल्या अनेक महिन्यापासून कायदेशीर लढा उभारला होता.
वासनवाडी शिवारातील गट नं-१५० अ मधील फेरफार ३०५० फेरफार प्रकरणात मंडळअधिकारी सचिन सानप यांनी आपल्या पद व अधिकाराचा गैरवापर केला होता.याप्रकरणात अपिलार्थी जमील महंमद गुलाम महंमद यांच्या वतीने अँड.दीपक कुलकर्णी यांनी बाजू मांडून सानप यांनी घेतलेल्या चुकीच्या निर्णयाबद्दल पुराव्यानिशी आपले म्हणणे मांडले होते.यात अँड.दीपक कुलकर्णी यांनी बाजू मांडताना तहसीलदार बीड यांनी दिनांक १७-०५-२०२३ रोजी पारित केलेल्या आदेशानुसार मंडलाधिकारी सचिन सानप यांनी प्राप्त अधिकाराचा वापर करून या प्रकरणात आदेश निर्गमित केल्याचे नमूद केले आहे.सदर आदेशाचे अवलोकन केले असता त्यात मंडळअधिकारी यांनी त्यांच्या स्तरावर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम १५५ अन्वये आदेश पारित करावे असे स्पष्टपणे नमूद केलेले नाही.तरीही सदर प्रकरणात मंडळअधिकारी सचिन सानप यांनी आपले पद आणि अधिकार याचा गैरवापर करत १५५ ची कारवाई करत सदर फेर मंजूर केला.यात अँड.दीपक कुलकर्णी यांनी बाजू मांडल्यानंतर उपविभागीय अधिकारी कविता जाधव यांनी अखेर हा फेरफार रद्द करत मंडळअधिकारी सचिन सानप यांना दणका दिला आहे.अँड.दीपक कुलकर्णी यांना या प्रकरणात अँड.विकास मिसाळ यांनी सहकार्य केले होते.
- आजचे राशीभविष्य!
- आजचे राशीभविष्य!
- शिंदे यांचा मोठा निर्णय!
- बांधकाम विभागाच्या शिंदेचे प्रमोशन वादात!
- आजचे राशीभविष्य!
कविता जाधव यांनी महसुल मध्ये काहीं ही होऊ शकतं ह्याला चाप लावला आहे , तलाठी , मंडळ अधिकारी ह्यांना कोणी मालक नसल्यासारखे वागत आहेंत अशा मुजोर अधिकाऱ्यांना थोडा तरी वचक राहील की आपण काहीं चुकीचं केले तर अधिकारी पाठीशी घालत नाहींत !
Leave a Reply