बीड- गेल्या 65 वर्षांपासून आर्थिक क्षेत्रात नावाजलेल्या द्वारकादास मंत्री बँकेवर आरबीआय ने निर्बंध का लावले माहीत नाही,पूर्वीच्या संचालक मंडळावर 229 कोटींच्या अपहाराचा गुन्हा का दाखल केला माहीत नाही,प्रशासकाची नियुक्ती का झाली माहीत नाही,बँकेवर राजकारणातून कारवाई झाली का,बँक राजकारणाची बळी ठरली का?माहीत नाही मात्र आरबीआय ने आता बँकेवरील निर्बंध उठवले आहेत अशी माहिती बँकेचे अध्यक्ष आदित्य सारडा यांनी दिली.
बीडच्या मंत्री बँकेवरील निर्बंध आरबीआय ने हटविले,त्यानंतर सारडा व इतर संचालक यांनी पत्रकार परिषद घेतली.यावेळी प्रशासक आल्यावर बँकेची आर्थिक परिस्थिती, नूतन संचालक मंडळ आल्यावर बँकेची स्थिती याची माहिती सारडा यांनी दिली.
बँकेवर निर्बंधांबाबतचे पत्र येण्यापूर्वी सहामहिणे आगोदर बँकेवर प्रशासकांची नियुक्ती होती. त्यामुळे बँकेचे जवळपास १४० कोटी रूपयांच्या ठेवी ठेवीदारांनी परत घेतल्या. निर्बंध लावण्याच्या पहिल्या दिवसापर्यंत कोण्यत्याही ठेवीदारास बँकेने ठेवी परत देण्यास नकार दिलेला नव्हता. निर्बंध लागल्यानंतर भारतीय रिझर्व बँकेने बँकेचे लायसन्स रद्द का करू नये अशा आशयाची कारणे दाखवा नोटीस दि. २१ ऑक्टोबर २०२२ रोजी बँकेस दिली. त्यांनी सदरील नोटीस मध्ये काढलेल्या सर्व मुद्यांची बँकेने पूर्तता करून सदरची नोटीस परत घेण्याबाबत रिझर्व बँकेच्या मुख्यालयास विनंती केली व ती त्यांनी मान्य केल्याचे अध्यक्ष डॉ.आदित्य सारडा म्हणाले.
- आजचे राशीभविष्य!
- आजचे राशीभविष्य!
- घाटनांदूर मध्ये राडा, जिल्हाधिकारी यांचे कठोर कारवाईचे आदेश!
- आजचे राशीभविष्य!
- आ क्षीरसागर यांची बदनामी, बीडमध्ये गुन्हा दाखल!
या पत्रकार परिषदेला. उपाध्यक्ष चितलांगे शुभम प्रदिप, संचालक गिल्डा गिरीश, डॉ. आदिती सुभाषचंद्रजी सारडा, लहाने संतोष बंजरंग,मुंडे अरुण त्रिंबकराव, पाटील अंजली भालचंद्र, वैष्णव सुधाकर देविदास, चौधरी रघुनाथ बाबुराव, खडके राहुल नंदकुमार, देशपांडे दिनेश नरहरी, शेख मोहम्मद सलीम मोहम्मद फकीर, गायकवाड राम नारायण, धारकर सतीश संपतराव, वाघ प्रल्हाद गणपत आदी संचालकांची उपस्थिती होती.
Leave a Reply