News & View

ताज्या घडामोडी

मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण !

मुंबई- मराठा समाजाला स्वतंत्र रित्या दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय विधानसभेने एकमताने मंजूर केला.मंगळवारी 20 फेब्रुवारी रोजी विशेष अधिवेशनात हा ठराव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडला जो सभागृहाने एकमताने मंजूर केला.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरक्षणाच्या विषयावर बोलताना म्हणाले की,मी बाळासाहेबांचा कार्यकर्ता आहे, मी शब्द पाळतो. त्यामुळे लोक माझ्यावर विश्वास ठेवतात. मी मागचा विषय काढणार नाही. मनोज जरांगे पाटील यांनी उभ्या केलेल्या आंदोलनाचा हा विजय आहे. मराठ्यांच्या इच्छापुर्तीचा हा दिवस आहे. सर्व समाजासाठी आमची समान भूमिका आहे. ना कोणावर अन्याय ना कोणाला धक्का दिला आहे, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.

समस्त राज्याला आणि ओबीसींना सांगतो की त्यांच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण द्यायचा निर्णय घेतला आहे. मराठ्यांना नोकरी आणि शैक्षणिक आरक्षण द्यायचा निर्णय घेतलाय. . मला एका जातीचा किंवा धर्माचा विचार करता येत नाही. मराठा असेल किंवा इतर समाज असेल त्यांच्याबद्दल तीच भावना व्यक्त केली असती, असं शिंदे म्हणाले.

आजचा दिवस महत्त्वाचा आहे. मी राजकीय बोलणार नाही. मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी १५० दिवस अहोरात्र काम सुरु होतं. सर्व कर्मचारी मेहनत घेत होते. गेल्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षण दिलं होतं. कोर्टात दुदैवानं ते टिकलं नाही. पण त्यात मी बोलणार नाही, असं ते म्हणाले.

२२ राज्यांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा अधिकचे आरक्षण आहे. हे विधेयक कोर्टामध्ये नक्की टिकेल. न्या. शुक्रे यांच्या अध्यक्षतेखालील आयोग हा वैध आहे. मी आज अभिमानाने सांगतोय की पाऊणे दोन वर्षांपूर्वी सत्ता हाती घेतलेल्या महायुती सरकारने ठरवले होते त्यानुसार आम्ही आज मराठा समाजाला आरक्षण जाहीर करत आहोत, असं शिंदे म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *